Talathi Bharti Exam 2023 | पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन -Talathi Bharti Exam 2023 | राज्यतील विविध पदासांठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत (Talathi Online Exam) गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार नाशिक येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून (Talathi Bharti Exam 2023) एका तरुणाला पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल, टॅब आणि हेडफोन जप्त केला आहे.

गुरुवारी राज्यात तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti Exam 2023) वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नाशिक येथील म्हसरुळ या ठिकाणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटो (Paper Leak) आढळून आले. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एका तरुणाला अटक (Arrest) केली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे आणखी कोण साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे. नाशिकमधील म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर (WebEasy Infotech Exam Center) तलाठी भरतीची ऑनलाइन परीक्षा घेतली जात होती. त्यावेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर एक तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन माबाईल, हेडफोन असे साहित्य मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले आहे.

विशेष म्हणजे त्या तरुणाच्या मोबाईलमध्ये आजच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचा फोटो मिळाले आहेत. त्यामुळे म्हसरुळ पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून परीक्षा केंद्रातील कोणत्या उमेदवाराला मदत करत होता? त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का? अशा प्रकारे काम करणारे एखादे रॅकेट आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

रोहित पवारांचा सरकारला इशारा

दरम्यान, नाशिक सोबत नागपूरमध्ये देखील तलाठी भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.
या आधीच जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी (State Home Minister) दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती
तर आज ही वेळ आली नसती. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल,
असा इशारा रोहित पवार यांनी राज्य सरकारला (State Government) दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: Anti-robbery squad arrested house burglary gang from Pimpri-Chinchwad, 18 tola gold jewellery & pistol seized