Rechargeable LED Bulbs | लाईट गेल्यानंतर सुद्धा काम करतात हे Rechargeable LED बल्ब, खुप स्वस्तात Amazon वर उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rechargeable LED Bulbs | वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या अगदी सामान्य आहे. उन्हाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे घरातील फ्रीज, कुलर, एसी, पंखे याशिवाय बल्बही बंद पडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी खूप त्रास होतो.

 

अंधारामुळे महत्त्वाची कामे थांबतात. यासाठी लोक इन्व्हर्टर वापरतात. पण, जर तुम्हाला इन्व्हर्टरवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर तुम्ही Rechargeable LED Bulbs ची मदत घेऊ शकता.

 

यामुळे लाईट गेल्यावरही तुमच्या घरात लाईट राहील आणि महत्त्वाचे काम थांबणार नाही. त्याची किंमतही फारशी नाही. तुम्ही स्वत:साठी सर्वोत्तम रिचार्जेबल LED बल्ब रु. 500 मध्ये सहज खरेदी करू शकता. येथे तुम्हाला अशाच काही Rechargeable LED Bulbs बद्दल सांगत आहोत.

 

PHILIPS Stellar Bright Rechargeable Emergency Inverter LED Bulb

PHILIPS चा हा Rechargeable LED Bulb सध्या स्वस्तात विकला जात आहे.
तो ई – कॉमर्स साइट अमेझॉनवर 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
यामध्ये 2200 mAH Li-ion ची रिचार्जेबल बॅटरी आहे.

यासह, लाईट चालू असताना तो चार्ज होत राहतो. कंपनीने यामध्ये सुरक्षेसाठी ओव्हर चार्जिंग प्रोटेक्शनही दिले आहे.
यामुळे बॅटरीला संरक्षण मिळते. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 4 तासांचा बॅकअप देते.
मोठ्या खोलीसाठी तुम्ही मोठा LED Bulb खरेदी करू शकता.

 

DesiDiya 9 Watt B22 Base 6500k Inverter Rechargeable Emergency LED Bulb

DesiDiya चा हा रिचार्जेबल बल्ब अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. यात 2200mAh लिथियम बॅटरी आहे.
यामुळे लाईट गेल्यावरही चार तास काम करत राहतो. याला चार्ज करण्यासाठी 8 ते 10 तास लागतात असे कंपनीने म्हटले आहे.
हा अमेझॉनवर 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

 

Web Title :- Rechargeable LED Bulbs | rechargeable led bulbs for your home available on amazon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा