Indian Railway Recruitment : 10 वी पास उमेदवारांसाठी पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकट काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक तरुण बेरोजगार झाले. अशा तरुणांसाठी केंद्र सरकारकडून रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. भारतीय रेल्वेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पश्चिम रेल्वेच्या अनेक रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेने जाहिरात काढली आहे.

इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर rrc-wr.com यावर भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 25 मे म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी http://www.rrc-wr.com या वेबसाईटवर अर्ज करावा.

एकूण जागा आणि पद
भारतीय रेल्वेत 3 हजार 591 जागांसाठी ही भरती निघाली आहे. यात कारपेंटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रोनिक मॅकेनिक, पेंटर, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, वेल्डर, डिझेल मॅकेनिक, रेफ्रिजरेटर, एसी मेकॅनिक इत्यादी जागा भरल्या जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 संध्याकाळ 5 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी 25 मे 2021 सकाळी 11 पासून सुरुवात झाली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वीची परीक्षा अधिकृत बोर्डातून 50 टक्के मार्कसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्यता प्राप्त ITI प्रमाणपत्र गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 इतके असावे.

जाहिरातीबाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.rrc-wr.com/rrwc/Act_Appr_2021-22/Apprentice_2021-22_Notification.pdf