‘MPSC’ अंतर्गत पशुसंवर्धन विभागात 435 जागांसाठी ‘भरती’, अर्जाची अंतिम तारीख 13 सप्टेंबर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने MPSC अंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुसंवर्धन विकास अधिकारी – गट अ या पदाच्या 435 जागासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. या वेबसाइटवरुन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. ही प्रक्रिया पूर्णता: ऑनलाइन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.

पदाचे नाव –
पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी – गट – अ’ पदासाठी सरकारकडून 435 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज करणाऱ्यासाठी शैक्षणिक पात्रता –
पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट –
या पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे अशी वयाची अट असणार आहे, यात मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज –
या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यासाठी अर्जदाराला https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या वेबसाइटवरुन अर्ज करावे लागतील.

परिक्षा शुल्क –
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जदारांना शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी परिक्षा खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना 374 रुपये शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गीयांना अर्जदारांना 274 रुपये परिक्षा शुल्क भरावे लागेल.

नोकरीचे ठिकाण –
या परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –