कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांसह विविध पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमध्ये विविध पदांसाठी 15 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याद्वारे प्राध्यापक पदी काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. या पदांवरील भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या पदांसाठी 5 आणि 6 मार्चला मुलाखती घेण्यात येतील.

पद आणि पदसंख्या –
1. कोर्स समन्वयक – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – भारतातील कोणत्याही विद्यापीठातून 55 टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी पास होणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील कामाला अनुभव हवा.
मुलाखत – 6 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

2. सहाय्यक प्राध्यापक – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह सबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मुलाखत – 5 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

3. सहयोगी प्राध्यापक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित शाखेतील पीएच. डी पदवी, किंमान 55 टक्के गुणांसह अकाऊंटसीमध्ये एमकॉम पदवी आणि नेट – सेट पात्र, संबंधित क्षेत्रातील कामाचा 08 वर्षांचा अनुभव.
मुलाखत – 6 मार्च 2020 सकाळी 11 वाजता.

शुल्क – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना 32,000 ते 35,000 रुपये पर्यंत वेतन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

मुलाखतीचे ठिकाण – अर्ज केलेल्या उमेदवारांनी शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर, 416004 पत्यावर मुलाखतीसाठी पोहोचावे लागेल.

अर्ज प्रक्रिया –
उमेदवार http://www.unishivaji.ac.in/uploads/recruitment/2020/at%20university/feb/temporary%20assi/Advt%2002-2020.pdf या वेबसाइटवर जाऊन नोटीफिकेशन वाचू शकतात. त्यानंतर उमेदवारांनी http://www.unishivaji.ac.in/ या वेबसाइटवर जावे, येथे संबंधित पदांची माहिती देण्या आली आहे.