कमी पाहुणे – PPE किटमध्ये जवान, ‘कोरोना’च्या संकटात यावेळी वेगळा असणार लाल किल्ल्यावरील स्वातंत्र दिवसाचा उत्सव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकट काळात देश उद्या म्हणजे 15 ऑगस्टला आपला 74वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. दिल्लीच्या किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तिरंगा फडकवतील. कोरोनामुळे यावेळी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. कमीत कमी पाहुण्यांना बोलावण्यात आले आहे आणि पीपीई किट घालून जवान तैनात असतील.

यावेळी सोहळ्यात केवळ नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) ची 500 मुले सहभागी होतील. या मुलांमध्ये सुद्धा 6 फुटांचे अंतर असेल. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात शाळकरी मुलांच्या उपस्थितीने जल्लोषाचे वातावरण निर्माण होत असे. प्रत्येक वर्षी सुमारे 3,500 शाळकरी मुले उपस्थित राहतात. त्यांना पंतप्रधानांशी हात मिळवण्याची संधी मिळत असे.

कोरोनामुळे यावेळी सोहळ्यासाठी ओपन पास जारी करण्यात येणार नाहीत. तर दोन्ही बाजूला केवळ 150 पाहुणे असतील. नेहमी अशा पाहुण्यांची संख्या 300 ते 500 असते. आता अनेक व्हीआयपी फोरग्राऊंडवर खुर्च्यांमध्ये दिसतील. एकुण पाहुण्यांची संख्या 2000 च्या जवळपास ठेवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेना, हवाईदल आणि नौदलाचे जवान गार्ड ऑफ ऑनर देतील. यामध्ये सुमारे 22 जवान आणि अधिकारी असतील. तर, राष्ट्रीय सॅल्यूटमध्ये 32 जवान आणि अधिकारी असतील, सोबत दिल्ली पोलिसांचे जवान सुद्धा असतील. कोरोना प्रोटोकॉलमुळे हे जवान चार रांगेत उभे राहतील आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील.

यावेळी सोहळ्यात कोरोना वॉरियर्ससुद्धा सहभागी होतील. अशी चर्चा आहे की, कोरोना वॉरियर्समध्ये दिल्ली पोलिसांचे 200 जवान, अर्धसैनिक दलाचे जवान आणि आरोग्य कर्मचारी यांचा सहभाग असू शकतो. कोरोनातून बरे झालेल्या लोकांनाही बोलवण्यात आल्याची चर्चा आहे. कोरोनाचा धोका असल्याने संपूर्ण परिसर चांगल्या प्रकारे सॅनिटाइज करण्यात येत आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने लाल किल्ल्यावर ध्वाजारोहणाची रश्शी हाताळणार्‍या महिला लष्करी अधिकार्‍याची कोरोना टेस्ट केली आहे. पीएम नरेंद्र मोदी यांची सुरक्षा पाहता महिला लष्करी अधिकार्‍याची ही चाचणी करण्यात आली आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान जेव्हा ध्वजारोहण करतील तेव्हा ते, ती रश्शी पकडतील जी प्रथम महिला लष्करी अधिकारी हँडल करेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like