Relationship | भारतीयांना आपल्या ‘पार्टनर’कडून काय हवे असते?, डेटिंग अॅपने उघड केली अनेक ‘रहस्य’; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Relationship | वैयक्तिक जीवन (personal life), प्रेमसंबंध (affair) किंवा रिलेशनशिप (Relationship) बाबत OkCupid Dating app ने अनेक आश्चर्यकारक आकडे समोर ठेवले आहेत. हे आकडे सांगतात की, भारतीय लोक याबाबतीत स्वताला कसे व्यक्त करतात आणि त्यांच्या जीवनात याचे किती महत्व आहे.
सर्वेत यूजर्सला विचारले गेले की, त्यांना कोणत्या गोष्टीच्या बाबतीत जास्त स्वातंत्र्य (freedom)
असल्याचे जाणवते. यूजर्सच्या प्रतिक्रियांवर आधारित डेटानुसार, 39 टक्के लोक आर्थिक बाबतीत स्वातंत्र्य खुप आवश्यक मानतात.
यानंतर ट्रॅव्हल (30 टक्के), सेक्श्युअलिटी (22 टक्के) आणि आर्ट (9 टक्के) चा नंबर येतो.
स्वातंत्र्य पैशापेक्षा जास्त प्रिय (Freedom is more important than money)
जेव्हा यूजर्सला विचारले गेले की, त्यांना पैसा आणि स्वातंत्र्यापैकी कोणती गोष्टी जास्त प्रिय आहे,
तेव्हा खुप हैराण करणारे निकाल समोर आले.
65 टक्के यूजर्सने म्हटले की, स्वातंत्र्य पैशापेक्षा जास्त प्रिय आहे.
तर 35 टक्के यूजर्सने पैशांना प्राधान्य दिले. यावरून स्पष्ट होते की भारतीय लोक पैशांसाठी स्वातंत्र्याशी तडजोड करत नाहीत.
27 टक्केंना पार्टनरसोबत जॉईंट खाते वाटते संकट (27 per cent think a joint account with a partner is a crisis)
नाते, भावना आणि आर्थिक स्वातंत्र्यामध्ये 68 टक्के यूजर्स रिलेशनशिपमध्ये पार्टनरला देण्यावर जास्त
विश्वास दाखवतात. 73 टक्के यूजर्सना वाटते की लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये आपल्या पर्सनल बँक खात्यातूनच फायनान्शियल स्वातंत्र्याचा आनंद घ्यावा.
तर 27 टक्के यूजर्स असेही आहेत ज्यांना आपल्या पार्टनरसोबत जॉईंट खाते संकट वाटते.
90 टक्के लोकांनी प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक मानले (90 percent said freedom of the press is necessary)
प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक आहे किंवा नाही? या प्रश्नाच्या उत्तरात 90 टक्के लोकांनी प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक मानले आहे.
धार्मिक स्वतंत्र्याच्या रक्षणासाठी कायदे असावे का? याच्या उत्तरात 76 टक्के यूजर्सचे म्हणणे आहे की, धार्मिक स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी कायदा आवश्यक आहे.
58 टक्के यूजर्सला सुरक्षेपेक्षा स्वातंत्र्य महत्वाचे (freedom is more important than security)
स्वातंत्र्य आणि सुरक्षेत सर्वात आवश्यक काय आहे? यावर 58 टक्के यूजर्सने म्हटले त्यांच्यासाठी स्वातंत्र्य महत्वाचे आहे. 42 टक्के यूजर्सने सुरक्षेला प्राधान्य दिले.
संस्कृती, जातीयता आणि वंश तुमच्या ओळखीत मोठी भूमिका निभावतात का? यावर 34 टक्के यूजर्स म्हणतात की, त्यांची ओळख त्यांच्या वारसापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
तर 25 टक्के लोक म्हणतात, संस्कृती, जातीयता आणि वंश त्यांची ओळख सांगण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात.
भारतीयांची स्वातंत्र्याबाबत संकल्पना (Indians concept of independence)
OkCupid च्या सिनियर मार्केटिंग मॅनेजर सितारा मेनन (Sitara Menon, senior marketing manager) म्हणतात, भारतीय लोक स्वातंत्र्याकडे नॅशनल किंवा पर्सनल लेव्हलवर खुलेपणाने व्यक्त होण्याच्या अधिकाराच्या दृष्टीकोनातून पाहतात.
अशा प्रकारचे बारकावे कम्पॅटिबिलिटीबाबत सांगतात आणि प्रेमाच्या शोधात खुप जास्त महत्वाचे होतात.
Web Title : Relationship | 65 percent indian daters choose freedom over money says report genz
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update