अरेच्चा ! घटस्फोटाच्या 55 वर्षांनंतरही महिलेचे त्याच पतीसोबत लग्न

वॉशिंग्टन : पती-पत्नी विभक्त होताना घटस्फोट घेतात. त्यानंतर ते एकत्र आल्याचे बहुतांश वेळा घडले नसेल. मात्र, अमेरिकेतील लास वेगासमध्ये राहणाऱ्या 78 वर्षीय डिएन रेनॉल्डने रिलेशनशिप पोर्टलवर तिच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले. त्यामध्ये तिने म्हटले, की घटस्फोटाच्या 55 वर्षांनंतर तिने त्याच पतीसोबत लग्न केले, ज्याच्यासोबत घटस्फोट घेतला होता.

डिएन रेनॉल्ड हिने सांगितले, की 1956 मध्ये तिचा आणि डेनिस यांनी एकाच शाळेत प्रवेश घेतला होता. दोघंही एकाच वर्गात होते. त्यावेळी ते दोघेही 13 वर्षांचे होते. आम्ही दोघे एकमेंकांना पसंत करत होतो. त्यानंतर आम्ही हळूहळू डेटिंगला जाऊ लागलो. वाढत्या वयानुसार, आम्ही 1961 मध्ये 18 वर्षांचे असताना आम्ही लग्न केले. माझ्या हनिमूनवेळी मी प्रेग्नंट होते. 2 वर्षांदरम्यान मी 2 मुलाची आई बनले. डेनिस कामावर जात होता आणि थकून घरी आल्यावर झोपत होता. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये नीट बोलणं ही होत नव्हतं. हळूहळू हेच आमचे रुटीन राहिले. आम्हा दोघांमधील दुरावा वाढला. त्यानंतर आम्ही 1965 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा घटस्फोट घेतला. डेनिस याने घटस्फोटानंतर दोनदा लग्न केले. तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत 31 वर्षे राहिला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्याने तिसरे लग्न केले. 17 वर्षांनतर 2017 मध्ये तिसऱ्या पत्नीचाही मृत्यू झाला.

मला समजले की डेनिसने मिलिट्रीमध्ये प्रवेश केला. मीदेखील जॉन जुबली नावाच्या एका व्यक्तीसोबत विवाह केला. आम्हाला 4 मुले झाली. 17 जुलै 1982 रोजी जुबलीचा मृत्यू झाला. मी एकटी 6 मुलांचा सांभाळ करत होते. ज्यावेळी माझ्या दुसऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला तेव्हा 54 वर्षांनंतर मला डेनिस भेटला. जेव्हा मी आजारी पडले. तेव्हा डेनिसने मला रुग्णालयात फुले पाठवली. त्यानंतर आम्हा दोघांचे बोलणे सुरु झाले. डेनिसने मला कारमध्ये बसवून संपूर्ण शहरातून फिरवले. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2020 ला आम्ही दोघांनी पुन्हा लग्न केले. आम्ही 1961 लाही याच तारखेला लग्न केले होते.