फायद्याची गोष्ट ! Jio नं बदलले ‘हे’ 4 प्लॅन, आता मिळणार दुप्पट डेटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर आता 4G डेटा व्हाऊचरमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीकडे पाच 4G डेटा व्हाउचर आहेत. त्यातील चार व्हाऊचरच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. बदललेल्या प्लॅनमुळे ग्राहकांना आता डबल डेटा आणि नॉन जिओ नंबरसाठी एफयूपी (FUP) मिनिट्स मिळणार आहेत.

जिओने आपल्या 4G पॅकमध्ये बदल केले असून ते 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयाचे आहेत. कंपनीने केवळ 251 रुपयाच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 11 रुपयाच्या प्लॅनमध्ये आता 800MB डेटा आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 75 मिनिटे मिळणार आहेत. यापूर्वी जिओने या प्लॅनमध्ये 400MB डेटा दिला होता.

त्याचप्रमाणे 21 रुपयाच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 1GB डेटा ग्राहकांना मिळत होता. परंतु आता या प्लॅनमध्ये व्हॅलिडीटी पर्य़ंत 2GB डेटा मिळणार आहे. तसेच ग्राहकाला ऑफ नेट कॉलिंगसाठी 200 मिनिट्स मिळणार आहेत.

जिओच्या 51 रुपयाच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 3GB डेटा ग्राहकांना मिळत होता. आता तो डबल करण्यात आला असून आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB डेटा मिळणार आहे. त्याचबरोबर ऑफ नेट कॉलिंगच्या ग्राहकांसाठी 500 मिनिट्स अधिकचे मिळणार आहेत.

जिओच्या 101 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 12GB डेटा आणि ऑफ नेट कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळणार आहेत. यापूर्वी या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB डेटा देण्यात येत होता. यासर्व प्लॅनमध्ये डेटा लिमीट संपल्यानंतर स्पिड 64 Kbps होईल.