JioGigaFiber ‘हायस्पीड’ इंटरनेट सेवा देणार, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठी कंपनी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने आता Reliance Jio GigaFibre हि नवीन सेवा आणली असून मागील काही महिन्यांपासून यासाठी काही शहरांमध्ये टेस्टिंग देखील सुरु होती. हि एक हायस्पीड इंटरनेट सेवा असून यामध्ये तुम्हाला 1 Gbps पर्यंत तुम्हाला स्पीड मिळणार आहे. डाउनलोड आणि अपलोडींगसाठी तुम्हाला १०० Mbps पर्यंत स्पीड मिळणार आहे. याचबरोबर एक गीगा फायबर सेट टॉप बॉक्स देखील मिळणार आहे. यामुळे ब्रॉडबँड द्वारे सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठी टक्कर मिळणार आहे.

या सुविधा मिळणार

JiO GigaFiber द्वारे संपूर्ण भारतातील ११०० शहरांमध्ये हि सुविधा दिली जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट, मल्टी पार्टी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. याद्वारे तुम्ही तुमच्या टीव्हीवर देखील इंटरनेटचा वापर करू शकता. त्याचबरोबर व्हर्चुअल रिएलिटी गेमिंग, डिजिटल शॉपिंग सारख्या सुविधा देखील मिळणार आहेत.

मागील वर्षी सुरु केले होते प्री-रजिस्ट्रेशन

यासाठी कंपनीने मागील वर्षी  प्री-रजिस्ट्रेशन सुरु केले होते. www.jio.com या कंपनीच्या वेबसाईटवर यासाठी तुम्हाला पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. याठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या ठिकाणाहून सर्वात जास्त ऍप्लिकेशन आले असतील त्याठिकाणी सर्वात आधी या सेवेला सुरुवात केली जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती.

आरोग्यविषयक वृत्त