Akshaya Tritiya 2021 Date : कधी आहे अक्षय तृतीया, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

नवी दिल्ली : वृत्त संस्था – हिंदू धर्मात अक्षय तृतीयाचे खुप महत्व आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे विशेष फलदायक मानले जाते. हा दिवस फल प्रदान करणारा मानला जातो. पुराणांमध्ये सुद्धा याचे महत्व सांगितलेले आहे. याच दिवसापासून सत्ययुगाची सुरूवात झाली होती, असे मानले जाते. अक्षय तृतीयाची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेवूयात…

तिथी आणि शुभ मुहूर्त :
प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी शुभकार्य केली जातात.

शुभ मुहूर्त :
* तृतीया तिथी प्रारंभ : 14 मे 2021, शुक्रवारी 05 वाजून 38 मिनिटांनी
* तृतीया तिथी समाप्ती : 15 मे 2021, शनिवारी 07 वाजून 59 मिनिटांनी
* अक्षय तृतीया शुभ मुहूर्त : 14 मे 2021 ला सकाळी 05 वाजून 38 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत
* सोने खरेदीचा शुभ मुहूर्त : 14 मे 2021 ला सकाळी 05 वाजून 38 मिनिटांपासून 15 मे 2021 ला 05 वाजून 30 मिनिटांपर्यंत

अक्षय तृतीयाचे महत्व :
अक्षय तृतीयाला सर्वसिद्ध मुहूर्त म्हणून महत्व आहे. या दिवशी पंचांग न पहाता कोणतेही शुभकार्य केले जाऊ शकते. तसेच विवाह, गृह-प्रवेश, वस्त्र-दागिने यांची खरेदी किंवा घर, जमीन, वाहन इत्यादी खरेदी केली जाऊ शकते. पुराणांमध्ये लिहिले आहे की, या दिवशी पितरांना केलेले तर्पन तसेच पिंडदान खुप फलदायक होते. या दिवशी गंगा स्नान केल्याने तसेच भगवत पूजन केल्याने समस्त पाप नष्ट होतात.