होळीला नजर काढण्यासाठी करा काली मातेची पुजा, जाणून घ्या नजर लागल्याची लक्षणं अन् पुजेचे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – होळीच्या दिवशी लोक अनेक उपाय करत असतात. त्यातील एक उपाय म्हणजे माता कालीची पूजा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायाला त्याच्या नातेवाईकांची नजर लागते तेव्हा काली माताच त्यांची सूटका करु शकते.

वाईट नजर लागल्याची लक्षण –
व्यवसायात अचानक नुकसान होणं, घरात वाद होत राहणं, आरोग्याच्या समस्या, पैशांचे नुकसान, लहान मुलांचे सततचे रडणे, त्यांना ताप येणे, नख खाण्याची सवय लागणे, पती पत्नीमध्ये कारण नसताना वाद होणे.

काली मातेच्या पूजेचे फायदे –
आरोग्यसंबंधित समस्या दूर होतात.
नकारात्मक ऊर्जा दूर होतो आणि सकारात्मकता येते.
बोलण्यातील कठोरता कमी होते, ज्यामुळे घरातील वाद कमी होतात.
व्यवसायात, नोकरीत फायदा होतो.
वाईट नजरेतून मुक्ती मिळते.
अनेक लोक आपल्याबद्दल ईष्येची भावना बाळगतात. माता कालीच्या पूजेने हे सर्व दूर होते.

होळीच्या दिवशी कशी करावी आराधना –
होळीच्या दिवशी काली मातेच्या समोर 7 गौऱ्या, 7 कौड्या ठेवून त्या 7 वेळा तोडून त्या काली मातेला नमन करत जळत्या होळीत टाकाव्यात. यामुळे तुम्हाला लागलेल्या नजरेतून तुमची मुक्ती होईल.