Video : रेमो डिसूजाचा हार्ट सर्जरीनंतर रुग्णालयात डान्स ! तुफान व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन –  प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) ला 11 डिसेंबर रोजी (वार शुक्रवार) हार्ट अटॅक आला होता. सध्या तो मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. अशी आशा आहे लवकरच तो बरा होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेईल. तो लवकर बरा होण्यासाठी चाहत्यांसोबत सेलेब्सही प्रार्थना करत आहेत. त्याचे साथीदार गीता कपूर (Geeta Kapoor) आणि टेरेंस लुईस (Terence Lewis) यांनीही सोशलवर पोस्ट शेअर केल्या आहेत. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही पोस्ट शेअर करत रेमोला गेट वेल सून म्हटलं आहे. अशात आता रेमोचा रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर जोरदार चर्चेत आहे.

रेमोची पत्नी लिजेल डिसूजा (Lizelle D’Souza) नं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, रेमो एका गाण्यावर पाय थकरवत काही स्टेप्स करत आहे. व्हिडीओ फक्त त्याचे पाय दिसत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना लिजेलनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिजेल म्हणते की, पायांनी नाचणं वेगळं आणि हृदयातून नाचणं वेगळं. तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी आभार असंही ती म्हणाली आहे.

रेमोची पत्नी लिजेल डिसूजा हॉस्पिटलमध्ये त्याच्या सोबत आहे. फेमस कोरियोग्राफर धर्मेश, सलमान युसूफ हेही हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाले आहेत. लिजेल ही कॉस्च्युम डिझायनर आहे. रेमो आणि तिला दोन मुलं आहेत.

रेमोच्या प्रकृतीबद्दल बोलायचं झालं तर अद्यापही तो आयसीयुमध्ये आहे. सध्या तो शुद्धीत असून त्याच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे.

 

रेमोच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर फालतू आणि एबीसीडी अशा सिनेमांसाठी त्याला ओळखलं जातं. तो डान्स अकॅडमी देखील चालवतो. रेमोनं डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा आणि स्टार प्लसवरील डान्स प्लस अशा डान्स शोचं जजिंगही केलं आहे. आपल्या उत्तम कोरियोग्राफीसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यात IIFA अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, स्टार डास्ट अवॉर्ड्स अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे.