आगामी काळात धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ? Video Clips बाबत रेणू शर्माच्या वकिलाचा धक्कादायक खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यामुळे विरोधकांकडून मुंडेंच्या (dhananjay munde) राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे मुंडेंनी हा आरोप चुकीचे असल्याचे म्हणत पैशासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मुंडेंविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे बरेच पुरावे आहेत. VIDEO CLIPS आणि खूप काही गोष्टी आहेत, त्या बाहेर आल्यानंतर सर्वांचे तोंड बंद होतील असे शर्मा यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान आरोप करणाऱ्या महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक बाब व्यक्त केली आहे. तक्रार दाखल करुन चार दिवस उलटूनही अद्याप ओशिवारा पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले. शर्मा यांच्यावर ब्लॅकमेल केल्याचा चुकीचा आरोप लावला जात आहे. माझी अशील अत्यंत सर्वसाधारण घरातील असून ती महिन्याला 10 ते 12 हजार रुपये भाड भरून पेइंग गेस्ट म्हणून राहते. तिच्याकडे प्रॉपर्टी नाही किंवा घर नाही, असे त्रिपाठी यांनी सांगितले. शर्मा यांना दोन वेळच जेवण मिळण अवघड आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या दागिने विकून पोट भरत आहेत. मुंडेंविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे बरेच पुरावे आहेत. सध्या तपास सुरू असल्याने ते पुरावे मी उघड करू शकत नसल्याचे वकिलांनी सांगितले.