नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Repo Rate Hiked | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आरबीआयने (RBI) रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. यानंतर रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या दरवाढीमुळे ऑटो (Auto), गृह कर्जासह (Home Loan) सर्व प्रकारचे कर्ज महागणार आहेत. परिणामी ग्राहकांना जास्त ईएमआय (EMI) भरावा लागेल. म्हत्वाचे म्हणजे देशातील महागाई नियंत्रणात आल्यानंतर आरबीआयने दर वाढ (Repo Rate Hiked) केली आहे.
आरबीआयने आज (बुधवार) आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर झाल्यानंतर तीन दिवस आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची (Monetary Policy Committee) बैठक झाली. एमपीसीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या (Repo Rate Hiked) बाजूने कौल दिला. यानंतर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची आणि त्यात घेतलेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. ज्यात रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्स म्हणजे 0.25 टक्के वाढ झाल्याने सर्वसामान्यांना पुन्हा धक्का बसला आहे.
Monetary Policy Statement by Shri Shaktikanta Das, RBI Governor – February 08, 2023 https://t.co/KGPgzXbpWN
— ReserveBankOfIndia (@RBI) February 8, 2023
20 लाखाच्या गृहकर्जावर किती EMI
जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) 20 वर्षासाठी 25 लाखाचे गृहकर्ज घेतले असल्यास तुम्ही आधी 8.60 टक्के व्याजदराने 21 हजार 854 रुपयांचा ईएमआय भरत होता. मात्र आता व्याजदर 25 बेस पॉईंटने वाढल्याने बँकेचा व्याजदर 8.85 टक्क्यांपर्यंत वाढेल. ज्यानुसार तुम्हाला 22 हजार 253 रुपये EMI भरावा लागेल. म्हणजे तुमचा ईएमआय सुमारे 40 रुपयांनी महाग होईल.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून
मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणे. तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.
म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दर ही
वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
Web Title :- Repo Rate Hiked | home loan emi calculator emis to go ups as rbi hikes repo rates by 25 basis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर