Republic Day : असा साजरा झाला स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली आणि यानंतर  हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला हे आपण सर्वजण जाणतोच. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, हा पहिला वहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला. त्यात कोण पाहुणे होते तसेच तो कुठे साजरा करण्यात आला. या सर्व प्रश्नांविषयी आपण आता माहिती घेणार आहोत.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रजासत्ताक दिनी आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी दिली.

तुम्हाला माहित आहे का की, पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पाहुणे म्हणून म्हणून कोण उपस्थित होते? पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात इंडोनेशियाचे अध्यक्ष परदेशी पाहुणे म्हणून उपस्थित होते. 26 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले. पहिल्या  प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विशेष परेड सादर करण्यात आली. ही परेड पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या आगळ्या वेगळ्या परेडचा लोकांनी विशेष आनंद लुटला.