चीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा, म्हणाले – ‘4 तर एकदम कोविड-19 सारखे’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस Coronavirus कुठून आला ? याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा तपासाची मागणी जोर धरू लागली आहे. या दरम्यान, चीनच्या संशोधकांनी China Researcher वटवाघुळात एका नवीन प्रकारच्या कोरोना व्हायरसचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. सीएनएनने आपल्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, नवीन शोधलेल्या कोरोना व्हायरसची Coronavirus प्रजाती जेनेटिक प्रकारे कोविड-19 व्हायरसच्या Covid-19 Virus अगदी जवळची असू शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

संशोधकांचे म्हणणे आहे की, दक्षिण पश्चिम चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या Coronavirus नव्या शोधातून समजते की, वटवाघुळांमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस असू शकतात, जे मनुष्याला संक्रमित करू शकतात.

Cell जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये शान्डोंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले, वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघुळांमधून आम्ही 24 प्रकारचे नोवेल कोरोना व्हायरस जमवले आहेत, यातील चार व्हायरस SARS-CoV-2 सारखे आहेत.

हे सॅम्पल मे 2019 ते नवंबर 2020 च्या दरम्यान छोट्या जंगलात राहणार्‍या वटवाघुळांतून जमवले होते. संशोधकांनी म्हटले की, त्यांनी वटवाघुळांचे मूत्र आणि शौचाच्या तपासणीसह तोंडाच्या स्वॅबचे सॅम्पल सुद्धा घेतले आहेत.

चीनी संशोधकांनुसार, एक व्हायरस जेनेटिक प्रकारे सार्स-कोव्ह-2 सोबत खुपच मिळता-जुळता आहे. SARS-CoV-2 हा तोच कोरोना व्हायरस Coronavirus आहे ज्याने संपूर्ण जगात विध्वंस माजवला आहे.
त्यांनी म्हटले, याचे स्पाईक प्रोटीन वगळता कोविड-19 सोबत खुप मिळता-जुळता आहे,
याचे स्ट्रक्चर तसेच आहे, जे पेशींमध्ये जाण्यासाठी व्हायरसमध्ये सामान्यपणे आढळून येते.

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी अमृत आहे एक फळ, वेगाने करते शुगर कंट्रोल

संशोधन पत्रात चीनी संशोधकांनी लिहिले आहे की, जून 2020 मध्ये थायलँडमध्ये सापडलेल्या SARS-CoV-2 व्हायरसशी पडताळणी केल्यानंतर हे परिणाम सिद्ध करतात की,
वटवाघुळात कोरोना व्हायरसचा प्रसार खुपच जास्त आणि दाट आहे.
यातून हे सुद्धा समजते की, काही परिसरात कोरोना व्हायरसची पसरण्याची प्रवृत्ती खुप जास्त असू शकते.

अमेरिकेसह जी7 च्या देशांनी याबाबत जोरदार मागणी केली आहे की, कोरोनाचा उगम कुठून झाला त्याचा शोध घ्यावा.
चीनच्या वुहान शहरात कोरोना संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर 1.5 वर्षानंतर सुद्धा हे समजलेले नाही की हा व्हायरस कुठून आला?
शास्त्रज्ञ ही सुद्धा मागणी करत आहेत की, वुहान लॅबमधून Wuhan Lab कोरोना लीक झाल्याच्या दाव्यावर सुद्धा पुढे तपास केला जावा आणि सत्याचा शोध घेतला जावा.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : researchers in china find batch of new coronavirus in bats

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा