Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शमशेर खान पठाण यांचं निधन झालं आहे (Retired ACP Shamsher Khan Pathan Dies). त्यांनी शुक्रवारी रात्री मसीना हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासुन आजारी होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. पठाण हे सन 1990 ते सन 2007 दरम्यान मुंबई पोलिस दलात (Mumbai Police) कार्यरत होते. अत्यंत गतीमान आणि लोकप्रिय पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

अनेक दिवसांपासुन शमशेर खान पठाण हे आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांनी मसीना हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अवामी विकास पार्टी नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता.

सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी (Mumbai 26/11 Attack)
जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबचा (Ajmal Kasab) मोबाईल गायब केल्याचा आरोप त्यांनी
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर केला होता. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली होती. त्यावेळी हे प्रकरण गाजले होते.

Web Title : Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | mumbai police retired acp shamsher khan pathan passed away he was president of awami vikas party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 50 लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक ! कंपनी चालकाकडे Whatsapp Call करून केली होती ‘डिमांड’

पुन्हा नोटबंदी ! 2 हजाराची नोट बंद होणार, ‘या’ तारखेपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत