Ridhima Pandit | छोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या 32 व्या वर्षी गोठवले बीजांड; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री रिधिमा पंडित (Ridhima Pandit) हिला छोट्या पडद्यावरील ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने रोबोट सुनेचे पात्र उत्तमरीत्या साकारत प्रेक्षकांना आपलेसे केले. रिधिमाचे (Ridhima Pandit) ते पात्र लोकांना आजही आठवते. आता रिधिमा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे रिधिमाने नुकताच बीजांड गोठवले असल्याचा खुलासा केला आहे.

याबाबत बोलताना रिधिमा म्हणाली, “गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मी बिजांड गोठवून घेतले आहे. माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी मला एक महिन्याचा अवधी मिळाला यादरम्यानच मी ही प्रक्रिया केली आहे. या प्रक्रियेत मी उत्तम डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील घेतले आहे. आज आपण कित्येक अभिनेत्रींना पाहतो की जे आपल्या करिअरसाठी आई होणे लांबणीवर टाकतात. यामुळे अनेकदा अभिनेत्रींना दोष देखील दिले जाते. हे चुकीचे आहे. अनेकदा आई झाल्यानंतर मुलं आणि काम कसं सांभाळणार हा प्रश्न तिला विचारला जातो. मात्र तोच प्रश्न पुरुषांना कधीही विचारण्यात येत नाही. आता मी बीजांड गोठवल्यामुळे लग्न लांबणीवर टाकले का? तर असे काहीच नाही.
सध्या मी सिंगल आहे. मी हा निर्णय घेतला कारण महिलांसाठी आई होण्याचे एक विशिष्ट वय असते.
त्यामुळे आता मला लग्न करण्याची काहीच घाई होणार नाही. माझ्यामते सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या होणे गरजेचे आहे, मात्र तसं नाही झालं तरी भविष्यात मला या गोष्टीची खंत कदापी वाटणार नाही”.

रिधिमाच्या (Ridhima Pandit) या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांकडूनही पाठिंबा मिळाल्याचे मत
अभिनेत्रीने सांगितले. यावेळी ती म्हणाली की, “माझी आई खूपच आधुनिक विचारांची आहे.
माझ्या घरातल्यानी देखील माझ्या निर्णयाला संमती दिली आहे.
जेव्हा मी याबाबत कुटुंबीयांबरोबर चर्चा केली तेव्हा मी सांगितलं की जर मला लग्न करावसं वाटलं नाही,
चांगला मुलगा मिळाला नाही आणि माझं जर करिअर फोकस करायचं ठरलं पण तरीही आई होण्याची इच्छा
झाली तर म्हणून मी आधीच याची तयारी करत आहे.
यावर माझ्या आईने नक्की विचार कर असा सल्ला मला दिला”.
रिधिमा बहु हमारी रजनीकांत या मालिकेबरोबरच खतरो के खिलाडी आणि हैवान यामध्ये देखील महत्त्वाची
भूमिका साकारताना दिसली. मात्र रिधिमाला बहु हमारी रजनीकांत या मालिकेतूनच जास्त प्रसिद्धी मिळाली.

Web Title : Ridhima Pandit | bahu humari rajanikanth fame actress ridhima pandit freeze eggs in early 30s revealed the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

TDM Movie | ‘टीडीएम’ चित्रपटात ‘पिंगळा’ गाणार राजा शिवरायांची गाथा; ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या अभूतपूर्व यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘टीडीएम’ चित्रपटात शुभचिंतन देणारा ‘पिंगळा’ ऐकवतोय राजा शिवबाची कथा

Sangli Crime News | विहिरीच्या पाण्यावरून झालेला वाद काका-पुतण्याच्या जीवावर बेतला; सांगलीमधील घटना