पाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !

मुंबई :पोलीसनामा आॅनलाईन

सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगाचा निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जीवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला आहे. रिव्यानी ही देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूलची केजी २ वर्गाची विद्यार्थी होती.

कुटुंबासोबत उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना 19 एप्रिल रोजी ती आपल्या मामासोबत दुचाकीने जात असताना एका मद्यधुंद गाडीचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रिव्यानीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. उपचारासाठी रिव्यानीला तातडीने नागपुरातील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी डाॅक्टरांनी रिव्यानीला ब्रेनडेड घोषित केले. या घटनेने रिव्यानीच्या आईवडिलांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आपली मुलगी गेली तरी अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना जीवदान मिळेल या सामाजिक हेतूने तिच्या आईवडिलांनी मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.