‘रोबोट’ रजनीकांतची उशीराने ‘कर’नाटकात उडी

कर्नाटक वृत्तसंस्था

कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यात रजनीकांत यांनी उशिराने का होईना, पण उडी घेतली आहे. रजनीकांत यांनी ‘कर्नाटकमध्ये काल जे घडले तो लोकशाहीचा विजय होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने कालावधी मागितला आणि राज्यपालांनी त्यांना १५ दिवसांचा कालावधी दिला होता ही लोकशाहीची थट्टा होती. परंतु , लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात उतरणार असे स्पष्ट केले असले, तरी त्यांनी आणखी त्यांच्या पक्षाची घोषणा केलेली नाही. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय योग्यवेळी जाहीर करणार असल्याचे सांगितले. रजनीकांत यांनी २०१९ सालची लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले नसले, तरी त्यांच्या बोलण्यावरून ते निवडणूक लढवणार असे वाटत आहे. कारण त्यांनी ‘आम्ही सर्वच गोष्टींसाठी तयार आहोत’, असे सांगितलं आहे. तसेच, भविष्यात राजकीय आघाडी करायची की ,नाही आणि केली तर कुणाबरोबर करणार , याबद्दल त्यांनी फारसे उघड मत मांडलेले नाही.

रजनीकांत यांनी २०१७ च्या अखेर राजकारणातल्या प्रवेशाची घोषणा केली होती. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचे रजनीकांत यांनी त्यावेळी जाहीर केले होते. २०२० दरम्यान तामिळनाडूमध्ये निवडणुकी होतील. त्यामुळे रजनीकांत दोन वर्ष थांबणार की २०१९ च्या लोकसभेत जाण्यासाठी प्रयत्न करणार हे लवकरच पाहायला मिळेल.