Rohit Pawar On Ajit Pawar | अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना…, रोहित पवारांचे चॅलेंज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) पवार कुटुंबीयातीलच (Pawar Family) दोन सदस्य एकमेकांसोमर उभे ठाकल्याने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष टोकदार झाला आहे. एकमेकांवर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मी तोंड उघडलं तर तुम्हाला लोकांमध्ये फिरणं अवघड होईल, असा इशारा अजित पवार यांनी आपल्या भावंडांना दिला होता. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले आहे. धाडस करुन तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले, बारामती मतदारसंघात दडपशाही आणि दबाव असतानाही कार्यकर्ते आणि लोक आमच्यासोबत येत आहेत. यावरुन तुम्ही कसा प्रतिसाद आहे, याचा अंदाज लावू शकता. अजितदादांच्या निवडणुकीत भावंडंही फिरली आहेत. अगदी बिहिणींनीही अजितदादांचा प्रचार केला आहे, आपल्याला लोकंच सांगतील. कोणत्या भावंडाबाबत त्यांचा आक्षेप आहे, नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अजितदादांनी धाडस दाखवून नाव घेऊन सांगावं. त्यानंतर ती भावंडंच त्यांना उत्तर देतील, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. रोहित पवार यांनी डिवचल्यानंतर अजित पवार कशा प्रकारे आरोपांना प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले अजित पवार?

माझी भावंड माझ्या निवडणुकीला कधी कुठे फिरली नाहीत, पण आता मात्र गरागरा फिरत आहेत. अरे तुमचा भाऊ उभा होता, तेव्हा नाही वाटलं का रे फिरावं? पण हे सगळं औटघटकेचे आहे. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात, तशा या छत्र्या उगवल्या आहेत. मी तोलून-मापून बोलतोय म्हणून ते काहीही बोलायला लागले आहेत. मी जर तोंड उघडलं तर यातील अनेकांना लोकांमध्ये फिरता येणार नाही, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | इतिहासाची मोडतोड करून पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करणार्‍या भाजप नेतृत्वाने चीन गिळंकृत करत असलेले ‘भोलेनाथा’चे कैलास वाचवावे