Rohit Pawar | सभागृहात ऊर्जामंत्र्यांच्या भाषणालाच वीज गेली आणि रोहित पवारांनी लगावला खोचक टोला

नागपूर: पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधकांकडे सरकारला घेरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यात कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर एनआयटी भूखंड हे गरम मुद्दे आहेत. मागील दोन दिवसांत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देखील मागितला होता. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ऊर्जा मंत्र्यांचे भाषण सुरू असताना अचानक वीज गेली आणि एकच गोंधळ उडाला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत यावर आपले मत मांडले आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) ट्वीटवर लिहितात, “वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आले. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडले. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटा मिनिटाला विजेसाठी झुंजावे लागत आहे! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?”

विधीमंडळाच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आपले निवेदन सादर करत असताना, अचानक वीज गेली आणि त्यांच्या समोरील माईक आणि सभागृहाचे दिवे बंद झाले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. वीज आल्यावर पुन्हा कामाला सुरुवात झाली.

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी देखील कर्नाटक सीमाप्रश्नाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत पडसाद उमटले.
सीमाप्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.
त्यावर बोलताना पाटलांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले.
तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नागपूर न्यास प्रकरणावरून महाविकास आघाडीने घेरले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar criticized shinde fadnavis government after assembly power cut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | जगात कोरोनाचा वाढता कहर, भारतात पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा