Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Rohit Sharma | भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरु असलेल्या T -20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. तरी देखील रोहित शर्माला (Rohit Sharma) गोलंदाजांची चिंता लागून राहिली आहे. त्यातच भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना सूर गवसतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजचा तिसरा आणि शेवटचा सामना इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियमवर (Holkar Stadium) खेळवण्यात येणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज :
होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडूला सातत्याने उसळी मिळत असते. त्यामुळे फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळून आपल्या भात्यातील सर्वोत्तम फटक्यांनी फलंदाजी करणे आवश्यक आहे. या स्टेडियमची सीमारेषा जवळ असल्याने गोलंदाजांची चिंता वाढणार आहे. (Rohit Sharma)

हवामानाचा अंदाज :
यादरम्यान तापमान कमीतकमी 21 अंश असण्याची शक्यता आहे. पावसाची अजिबात शक्यता नाही.

भारतीय संघ: (India Cricket Team)
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ: (South Africa Team)
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, तबरेझ शम्सी

आजचा सामना कुठे आणि कधी पाहता येणार?
तिसरी टी-20 : भारत वि. द. आफ्रिका
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
वेळ : संध्याकाळी 7 पासून
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Web Title :- Rohit Sharma | predicted playing xi 3rd t 20 live streaming head to head pitch and weather report sport news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा ई-मेलवरुन राजीनामा

Pune Crime | महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला