Royal Enfield Bullet 350 | 15 हजार देऊन घरी घेऊन जा दमदार क्रूझर बाईक, इतका असेल मंथली EMI; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Royal Enfield Bullet 350 | देशात मायलेज देणार्‍या बजेट बाईकनंतर स्पोर्ट आणि क्रूझर सेगमेंटची बाईक सर्वात जास्त डिमांडमध्ये आहे. ज्यामध्ये आज आपण क्रूझर सेगमेंटमधील सर्वात जास्त पसंत केली जाणारी बाईक रॉयल एनफील्ड बुलेट 350 च्या (Royal Enfield Bullet 350) विशेष ऑफरबाबत जाणून घेणार आहोत.

Royal Enfield Bullet 350 बाईक कंपनीची बेस्ट सेलिंग बाईक आहे, जी दमदार इंजिन साऊंड आणि क्लासिक लुकसाठी पसंत केली जाते.
रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये आहे जी टॉप मॉडलमध्ये 1.60 लाख रुपये होते.

या बाईकच्या किंमतीमुळे ती पसंत करणार्‍या अनेक लोकांना कमी बजेटमुळे खरेदी करता येत नाही.
अशा लोकांना लक्षात घेऊन आम्ही जो प्लान सांगत आहोत त्यामध्ये ही बाईक केवळ 15 हजार रुपये देऊन घरी आणता येईल.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या बाईकचे दोन व्हेरिएंट आहेत.

346 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 19.36 पीएसची पावर आणि 28 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स दिला आहे.

फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आहे, ज्यासोबत सिंगल चॅनल एबीएस सिस्टम आहे.

रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक आहे.

बाईकचे टायर ट्यूबचे आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, बाईक 40.8 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. हा मायलेज ARAI प्रमाणित आहे.

 

आता 15 हजारच्या डाऊन पेमेंटमध्ये बाईक घरी आणण्याच्या ऑफर बाबत जाणून घेवूयात…

टू-व्हीलरची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार…

ही बाईक किक स्टार्ट व्हेरिएंटमध्ये खरेदी केली तर कंपनीसोबत जोडलेली बँक या बाईकवर 1,42,933 रुपयांचे लोन देईल.
ज्यावर 15,881 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल.

या डाऊन पेमेंटनंतर तुम्हाला दर महिना 5,121 रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल.
या लोनचा कालावधी 36 महिने असेल आणि लोनच्या एकुण रक्कमेवर 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज घेईल.

आवश्यक सूचना :

या बाईकवर मिळणारे लोन, ईएमआय, डाऊन पेमेंट आणि व्याजदर, तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोअरवर अवलंबून आहे.
ज्यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास बँक बदल करू शकते.

 

Web Title : Royal Enfield Bullet 350 | royal enfield bullet 350 with down payment rs 15000 and emi plan read full

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

Stock Market | रतन टाटा यांच्या कंपनीचे झाले 21400 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानी यांना झाला मोठा फायदा; जाणून घ्या नेमकं काय झालं

TATA Group च्या ‘या’ 2 शेयरमधून राकेश झुनझुनवाला यांनी एका महिन्यात कमावले 893 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का?