RSS Madandas Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यस्कार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RSS Madandas Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (All India Student Council) माजी संघटनमंत्री मदनदास देवी (वय-82) यांचे बंगळुरूमध्ये सोमवारी (दि.24) पहाटे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच होते. मदनदास देवी (RSS Madandas Devi Passed Away) यांच्यावर मंगळवारी (दि.25) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Smashanbhumi) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. मदनदास देवी यांच्यावर वर्षभरापूर्वी हरिद्वार येथील पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर थेरपीद्वारे उपचार करण्यात आले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच पूर्ण सह सरकार्यवाहक मदनदास देवी (RSS Madandas Devi Passed Away) यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. मदनदास देवी यांचे पार्थीव मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील मोती बाग येथील संघाच्या कार्यालयात ठवण्यात येणार आहे. मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda), धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यासह अनेक नेते मंडळी पुण्यात येणार आहेत.

लहानपणापासून मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केले.
तसेच आयुष्यातील 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे (BJP) राजकीय निरीक्षक म्हणून कार्यरत होते.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | स्वारगेट चौकात व्यावसायिकावर फायरिंग करणार्‍या मुख्य आरोपींना क्राईम ब्रँचकडून अटक ! 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे अन् साडेतीन लाखाची रोकड जप्त (Video)