Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांना EVM ची पूजा पडली महागात, सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rupali Chakankar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज मतदान सुरू होण्यापूर्वी एक अनाकलनीय प्रकार केला. चाकणकर यांनी चक्क ईव्हीएमची पूजा केली (EVM Machine Pooja). ही पूजा त्यांना महागात पडली आहे. कारण यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणकर या अनुभवी राजकीय नेत्या असूनही त्यांनी असा प्रकार का केला, याबाबत अनेकांना आश्चर्य वाटत आहे.(Rupali Chakankar)

आज बारामती मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. प्रमुख राजकीय नेत्यांनी आपआपल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Lok Sabha) मतदान करण्यासाठी सकाळी धायरी येथील एका मतदान केंद्रावर गेल्या.

यावेळी चाकणकर यांनी मतदानापूर्वी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली.
ही पूजा चाकरणकर यांच्या अंगलट आली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चाकणकर अडचणीत आल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ