‘या’ गाण्यावरून सचिन पिळगावकर झाले सोशल मीडियावर ट्रोल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गाण्याची शब्दरचना ,संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे अभिनेते ,गायक सचिन पिळगावकर यांना मोठ्या प्रमाणात नेटीझन्सनी ट्रोल केले आहे.  सचिन पिळगांकर सध्या युट्युबवरील त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61246aff-ac39-11e8-90e6-7faaacf3167d’]

 ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणे सोशल मीडियावर काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाऊंटवरून ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे सचिन पिळगांवकर यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

या व्हिडीओखालील डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडीओविषयी लिहिण्यात आले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हीच वैशिष्ट्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ पण या गाण्यावरून नेटिझन्सने सचिन पिळगांवकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे.९0 च्या दशकात व्हिडियो शूट झाल्या सारख वाटत’, ‘आणि अश्या रीतीने डिंच्याक पूजाला मराठी माणसाकडून टफ कॉम्पिटेशन , अशा आशयाच्या कमेंट नेटीझन्सनी सोशल मिडीयावर टाकून सचिन पिळगांवकर यांना ट्रोल केले आहे.त्यामुळे  युट्यूबवरून हा व्हिडीओ काढण्यात आला आहे.

भीमा-कोरेगांव मामले में  ट्विंकल खन्ना की प्रतिक्रिया

सचिन पिळगांवकर यांनी हा व्हिडीओ काढल्यानंतरही नेटीझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.  ‘महागुरुचा नुकताच प्रदर्शित झालेला मुंबईवरचा व्हिडिओ युवट्युबवरच्या रसिकांच्या अफाट कौतुकामुळे काढून टाकण्यात आला आहे. कमेंट वाचून येडा झाला महागुरु , ‘कसले दुष्ट लोक आहात रे तुम्ही सारे…. …. तुमचा सर्वांचा निषेध…’, तो व्हिडीओ काढल्यानंतर अशा  कमेंटही फेसबुकवर नेटीझन्सनी दिल्या आहेत.

जाहीरात