गुरु आचरेकरांच्या पार्थिवाला दिला सचिन तेंडुलकरांनी खांदा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटची बाराखडी शिकवून ‘सचिन तेंडुलकर’ नावाचा क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत कचरेकर यांचे काल बुधवारी वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सचिन तेंडुलकर यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला असून आचरेकरांच्या घरून पार्थिव निघताच सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या पार्थिवाला अंत्ययात्रे दरम्यान खांदा देऊन आपल्या गुरु प्रति असणारे प्रेम व्यक्त केले आहे.

शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत रमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या प्रसंगी क्रिकेटमधील अनेक जाणकार मंडळी या वेळी उपस्थित होती. आचरेकर सर हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू यांच्या सारखे लोकप्रिय क्रिकेटपटू घडवले आहेत. त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. आचरेकर सरांना आज सचिन तेंडुलकर यांच्या सह त्यांच्या असंख्य चाहत्यांनी सअश्रू अखेरचा निरोप दिला आहे.

रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर यांनी माध्यमात आपली भावुक प्रतिक्रिया दिली होती. त्यात ते म्हणाले होते, “आचरेकर सरांनी आम्हाला मैदानात आणि मैदानाच्या बाहेर नेहमी सरळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आयुष्यात येण्याचा मला योग आला हे मी माझे भाग्य समजतो. तर त्यांच्या हाताखाली मी क्रिकेटचे धडे सर्व प्रथम गिरवले याचा हि मला अभिमान वाटतो. आचरेकर सरांमुळे आता स्वर्गातील क्रिकेट समृद्ध होणार आहे. माझ्या आयुष्यात त्यांचे काय स्थान होते हे मी शब्दात सांगू शकणार नाही मला क्रिकेटची बाराखडीच सरांनी शिकवली होती. आज मी यशाच्या ज्या उंच शिखरावर आहे याचे सर्व योगदान आचरेकर सरांना आहे” अशी भावुक प्रतिक्रिया आपल्या गुरूच्या जाण्याने दुःखी झालेल्या सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली होती. मागच्या काही दिवसा पूर्वी मी क्रिकेट मध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलानां सोबत घेऊन आचरेकर सरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्या मुलांना क्रिकेट बद्दल उत्तम मार्गदर्शन केले होते. त्यामुळे मला असे वाटते कि आचरेकर सर जिथं कुठं जातील तेथे ते क्रिकेटचे मार्गदर्शन करत राहतील असे भावुक उदगार सचिन तेंडुलकर यांनी प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांच्या बद्दल काल त्यांच्या निधनानंतर काढले होते.

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या आचरेकर सरांना शासनाने शासकीय मानवंदना दिली नाही. त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले गेले नाहीत म्हणून क्रिकेट जगतात शासना बद्दल नाराजीचा सुर उमटला आहे.