स्फोटकांची कार लावण्यात API वाझेंच्या सहभागाची शक्यता; NIA च्या संशयाने खळबळ

ADV

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. एनआयएने केलेल्या तपासात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचाही स्कॉर्पिओ कार तेथे लावण्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी वाझे यांनी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी १९ मार्चला होणार आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनविणे, स्फोटकांची कार लावणे आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. मध्यन्तरीच्या काळात स्कॉर्पिओ कारचे मालक मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात हिरेन कुटूंबियांनी वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव या प्रकरणात समोर आले आहे. वाझे यांचा अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी जिलेटीनने भरलेली कार पार्क करण्याच्या कटात थेट सहभाग होता, असा आरोप एनआयएने लावला आहे. यामुळे मनसूख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांच्या कारचा थेट संबंध वाझेंशी जोडला जाण्याची शक्यता आहे.

ADV

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर
सचिन वाझे यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक महिती समोर आली आहे. अंबानी यांच्या निवासस्थनाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओचा वापर चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी हि कार अंबानींच्या घरासमोर आढळली तत्पूर्वी ती वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.