केंद्र सरकारने बदलली रणनिती, आता प्रत्येक राज्यासाठी कोविड लसीकरणाचे दिवस ठरले, जाणून कसा घ्या कसा होता अभियानाचा दुसरा दिवस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता प्रत्येक राज्यासाठी लसीकरणाचे (vaccination ) दिवस ठरवले आहेत. सरकारने हे पाऊल यासाठी उचलले आहे की, इतर आरोग्य सेवांवर परिणाम होऊ नये. अगोदर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आठवड्यात चार दिवस लस देण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गोवामध्ये सर्वात कमी दोन दिवस आणि आंध्र प्रदेशात सर्वात जास्त आठवड्याचे सहा दिवस लस दिली जाईल. या दरम्यान कोरोनाविरूद्ध राष्ट्रव्यापी लसीकरण (vaccination) अभियान सुरू होण्याच्या दुसर्‍या दिवशी रविवारी देशातील सहा राज्यांमध्ये 553 सत्रांमध्ये लसीकरण (vaccination) अभियान चालले. यामध्ये एकुण 17,072 लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सीन देण्यात आली.

कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात दिली जाणार लस

1- उत्तर प्रदेश – गुरुवार, शुक्रवार
2- हिमाचल प्रदेश- सोमवार, मंगळवार
3- बिहार- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार
4- हरियाणा- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
5- जम्मू-काश्मीर- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
6- झारखंड- सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार
7- मध्य प्रदेश – सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार
8- पंजाब- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
9- राजस्थान- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार
10- उत्तराखंड- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
11- बंगाल – सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार
12- चंडीगढ- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
13- छत्तीसगढ़- सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार
14- महाराष्ट्र- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार

हे आहे लसीकरणाचे नवीन शेड्यूल
आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव मनोहर अगनानी यांनी म्हटले की, अंदमान निकोबार बेट, नागालँड आणि ओडिसामध्ये आठवड्यात तीन दिवस लसीकरण चालवले जाईल, तर अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंडीगढ, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये आठवड्यात चार दिवस लस दिली जाईल. झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, पुदुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडु, तेलंगना, त्रिपुरा, उत्तराखंड आणि बंगालमध्ये सुद्धा आठवड्यात चार दिवस लसीकरण अभियान चालवले जाईल. गोवा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात आठवड्यात दोन दिवस लस दिली जाईल.

2.24 लाख लोकांना लस, 447 जणांमध्ये हलका दुष्परिणाम
अगनानी यांनी सांगितले की, लसीकरण अभियानाच्या दुसर्‍या दिवशी सहा राज्यांमध्ये 17,072 लाभार्थ्यांना लस दिली गेली. अशाप्रकारे आतापर्यंत एकुण 2,24,301 लाभार्थ्यांना व्हॅक्सीन दिली गेली आहे. यामध्ये केवळ 447 लोकांवरच याचा प्रतिकुल प्रभाव पडल्याची प्रकरणे समोर आली आहेत. प्रतिकुल प्रकरणांमध्ये ताप, डोकेदुखी, उलटी यासारख्या आरोग्य समस्या दिसून आल्या.