Sadabhau Khot | 1 ते 3 रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा; सदाभाऊ खोत यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot | राज्य सरकारने (State Government) एक रुपयांमध्ये पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) लागू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 1 ते 3 रुपयांपर्यंत पशुधन विमा (Livestock Insurance) द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. विम्याच्या माध्यमातून पशुधनाचे दायित्व सरकार स्वीकारणार असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल. तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी (Upper Collector) यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस प्रशासन (Police Administration), एफडीए (FDA) यांना सोबत घेऊन संयुक्त समिती बनवण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले आहे.

दरम्यान, दूध खरेदी दर (Milk purchase Rate) हा राज्यात एकसारखा असावा आणि तो 35 रुपये लिटर देण्यात यावा, अशी भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचे विखे पाटील यांचे अभिनंदन केले. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागत असल्याने रयत क्रांती संघटनेने दूध परिषद घेतली होती. तसेच दूध दर कमी झाल्याने याबाबत तत्काळ बैठक लावण्यासाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मंत्री विखे पाटील यांनी पुण्यात बैठक घेतली होती. यामध्ये दुधाला 35 रुपये दर देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Web Title :  Sadabhau Khot | farmers leader sadabhau khot discussion with minister radhakrishna vikhe patil about farmer issues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा