Sai Tamhankar | सई ताम्हणकरने दिले नाही मित्राचे हजारो रुपये; देणार ही नाही असे सांगितले

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय व यशस्वी अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचे नाव हमखास येते. सईने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा मोठा चाहता वर्ग असून सईने (Sai Tamhankar) बॉलीवुडमध्येही चित्रपट केले आहे. यशाच्या शिखरावर असलेली सई मात्र एका मित्राचे हजारो रुपये देणे आहे. लाखो रुपये कमावत असली तरी ते तिने दिलेले नाही. याची कबुली स्वतः सईने दिली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. तिच्या अनेक हाऊसफूल थिएटर मिळवण्याऱ्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘दुनियादारी’ (Duniyadari). संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित या ‘दुनियादारी’ चित्रपटाने तरुणांना अक्षरशः वेड लावले होते व प्रत्येकाला कॉलेजच्या दिवसांची आठवण करुन दिली होती. याच सुपरहिट दुनियादारी चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दुनियादारी चित्रपटाची संपूर्ण टीम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी सईने अजूनही तिच्या मित्राचे पैसे दिले नसल्याचे सांगितले आहे.

कार्यक्रमा दरम्यान भाऊ कदमने (Bhau Kadam) सईला एमबीए असे लिहिलेले पुस्तक भेट दिले. यावर सई जोरजोरात हसू लागली. त्यानंतर सईने या पुस्तकामागची गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली. तिने सांगितले की,”मी चित्रपटांमध्ये काम करत होते. पण अभियन क्षेत्राबरोबरच एक बॅकअप प्लॅन असावा म्हणून एमबीए करण्याचे ठरवले. यावेळी एका कॉलेजमध्ये माझ्या ज्या मित्राच्या वशिल्याने मी ॲडमिशन घेतले होते, त्याचे 15 हजार रुपये मी अजूनही त्याला दिलेले नाहीत आणि त्याला मी ते कधीही देणार नाहीये. पुढे त्या एमबीएचं मी काहीही केलं नाही. त्याची सगळी पुस्तकं माझ्या घरात अजूनही तशीच पडून आहेत.”

अशी एमबीएच्या बॅकअप प्लॅनची मज्जेशीर आठवण सई ताम्हणकरने सर्वांसोबत शेअर केली. सर्व प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’ च्या या एपिसोडची (Sai Tamhankar In CHYD) उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने दुनियादारी मध्ये ‘शिरीन’ ही भूमिका साकारली होती. तसेच तिने तू ही रे (Tu Hi Re), वजनदार (Vazandar), क्लासमेट (Classmates), धुराळा (Dhurala) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सई मीमी (Mimi) या बॉलीवुड चित्रपटामध्ये झळकली होती.

Web Title :  Sai Tamhankar | sai tamhankar borrowed fifteen thousand from her friend and did not returned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा