Saiyami Kher | वयाच्या 18 व्या वर्षी करायला सांगत होते नाकाची व ओठांची सर्जरी; अभिनेत्री सैयामी खेरने सांगितले बॉलीवुड इंडस्ट्रीचे सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) ही सध्य़ा चर्चेत आलेली अभिनेत्री आहे. सैयामी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सैयामीचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सैयामी हिने 2016 साली ‘मिर्झिया’ या चित्रपटातून (Mirzya Movie) बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये दमदार पदार्पण केले. तिच्या कातील अदांवर आणि डोळ्यांवर चाहते फिदा आहेत. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना सैयामी तिची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच तिचा ‘घुमर’ हा चित्रपट (Ghoomer Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र तिने प्रमोशन दरम्यान बॉलीवूड इंडस्ट्रीचे सत्य मांडले आहे. तिला सुरुवातीला आलेले अनुभव सांगितले असून यामुळे अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) ही चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सैयामी खेर हिने या इंडस्ट्री सोबत कोणताही संबंध नसताना यामध्ये येण्याचा निर्णय घेतला. बॉलीवुडच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेकांनी ओठाची व नाकाची सर्जरी (Lip Surgery) कर असे सुचवण्यात आले होते. तेव्हा तिचे वय अगदी 18 होते. तिच्या आगामी ‘घुमर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैयामीने तिचे अनुभव शेअर (Saiyami Shares Bollywood industries Reality) केले आहेत. ती म्हणाली की, बॉलीवुडमध्ये नवोदित कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. माझ्या सुरुवातीच्या काळात लोकांनी मला तुझ्या ओठांची आणि नाकाची सर्जरी कर असे सुचवले. कोणत्याही 18 वर्ष वयाच्या मुलीला असा सल्ला देणे अतिशय चुकीचे आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी मला अतिशय धक्कादायक वाटल्या. आयुष्यातील एका नव्या खेळात सहभागी होत आहे असे मला तेव्हा वाटले.”

पुढे ती म्हणाली की, “या इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणाऱ्य़ा प्रत्येकाला अनेक गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. मला देखील काही गोष्टी स्वीकारव्या लागल्या. मला या बॉलीवूडच्या नियमांचा किंवा इथे असलेल्या लोकांचा कधीच त्रास झाला नाही. पण अशी मला आशा आहे की एक दिवस नक्कीच हे सगळे नियम चित्रपटसृष्टीतून निघून जातील.” अभिनेत्री सैयामी खेर हिला तिच्या कुटुंबाकडून कसा आधार मिळाला याबद्दल तिला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. यावर ती उत्तर देत म्हणाली की, “माझे कुटुंबीय आणि माझे खास मित्र माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला फरक पडतो. त्यांचे मत मला आयुष्यात जास्त महत्त्वाचे वाटते. आयुष्यातील सुरुवातीच्या त्या कठीण काळात मला माझे कुटुंबीय आणि मित्रांनी खूप आधार दिला. आता हळूहळू बॉलीवूडमधील अनेक गोष्टी बदलत आहेत.” असे मत अभिनेत्री सैयामी खेर हिने मांडले आहे. अनेकांनी तिच्या या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे.

अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) हिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सैयामीने अनपोझड (Unpaused), ब्रीथ (Breathe), रे (Rey), 8 एएम मेट्रो (8 A.M. Metro), वाईल्ड डॉग (Wild Dog) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सैयामी माऊली (Mauli Movie) या मराठी चित्रपटामध्ये देखील झळकली होती. यामध्ये तिने अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोबत भूमिका साकारली होती. लवकरच तिचा ‘घुमर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शबाना आझमी (Shabana Azmi), अंगद बेदी (Angad Bedi), हे कलाकार भूमिका साकारणार आहे. येत्या 18 ऑगस्टला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित (Ghoomer Release Date) होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)