हॉलीवुड स्टार Salma Hayek ची ब्रेस्ट साईज का वाढत चाललीय? उत्तर ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली : हॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस सलमा हायेकने (salma hayek) एका मुलाखतीमध्ये त्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत जे मागील मोठ्या कालावधीपासून तिच्याबाबत उपस्थित केले जात आहेत. सलमाची ब्रेस्ट साईज वाढत असल्याने असे म्हटले जात होते की, तिने सर्जरी करून घेतली आहे, परंतु आता सलमाने Red Table Talk नावाच्या चॅट शोमध्ये चर्चा करताना खुलासा केला की असे तिच्या बाबतीत हे यामुळे घडत आहे कारण ती रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉझमधून जात आहे.

संशय आल्याने डॉक्टरांची घेतली भेट
सलमाने सांगितले की, जेव्हा तिला याबाबत संशय आला तेव्हा तिने डॉक्टरांची भेट घेतली आणि डॉक्टरांनी तिला अनेक विचित्र प्रश्न विचारले. सलमाने म्हटले की, त्यांचे प्रश्न खुपच भितीदायक होते आणि विचित्र गोष्टी विचारल्या. त्यांनी विचारले की, तुझे कान वाढत आहेत का आणि केसांची वाढ होत आहे का? त्यांनी विचारले की, तुला दाढी-मिशी येत आहे का आणि खुप लवकर इरिटेशन होत आहे का?

 

डॉक्टरांनी सलमाला विचारले हे प्रश्न…
डॉक्टरांनी सलमाला विचारले की, तु अनेकदा विनाकारण रडू लागतेस का आणि तुझे वजन वेगाने वाढत आहे का? तुझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रायनेस येत आहे का, आणि काहीही खाल्ले तरी वजनात फरक पडत नाही का? अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरांनी सलमाला सांगितले की, तिला मेनोपॉझ होत आहे. परंतु एक गोष्ट अशी होती जी डॉक्टरांनी सलमाला सांगितली नव्हती.

 

मेनोपॉजनंतर वाढते ब्रेस्ट साईज
चॅट शोमध्ये तिने सांगितले की, अनेक महिलांची ब्रेस्ट सुद्धा खुप वाढते. अनेक महिला आपल्या मुलांना दूध पाजतात त्यामुळे त्यांची ब्रेस्ट साइज वाढते. सलमाने म्हटले, अनेक लोकांना वाटते की, मी ब्रेस्ट वाढवण्यासाठी सर्जरी केली आहे. सलमाचे वय 54 वर्ष आहे आणि लवरकच ती मार्वलचा चित्रपट इटर्नल्समध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : salma hayek says her breasts have kept growing as she goes through menopause know shocking response

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update