Salman Khan | सलमान खानला एल्विशला ओरडल्यामुळे गॅंगस्टर गोल्डीबारने दिली धमकी

पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan | बिग बॉस ओटीटी सिजन 2 (Bigg Boss OTT Season 2) हा सध्या चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी 2 हा शो सुरु झाल्यापासून नवनवीन भांडणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉस शो व वादविवाद हे तर जणू समिकरणच बनले आहे. आठवडाभर स्पर्धेक बिग बॉसच्या घरामध्ये (Bigg Boss house) धुडगूस घालत असतात. मात्र ‘विकेंड का वार’ या दिवशी त्यांच्या सर्व चूकांमुळे होस्ट स्पर्धकांची शाळा घेतो. बिग बॉस ओटीटी 2 चा होस्ट देखील सलमान खान (Salman Khan) आहे. मात्र या ‘विकेंड का वार’ दिवशी सलमान खानने स्पर्धेक एल्विश (Elvish Yadav) याला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. मात्र यामुळे सलमानला गोल्डीबार याने धमकी दिली आहे.

बिग बॉस ओटीटी सिजन 2 चा लोकप्रिय स्पर्धेक एल्विश यादव हा नेहमी चर्चेत असलेला स्पर्धेक आहे. एल्विशने (Elvish Yadav Argument In BB) बिग बॉसच्या घरात अनेक वाद घातल्यामुळे तो प्रेक्षकांचा आवडीचा बनला आहे. यावेळी मात्र त्याने घरातील सदस्य बेबिका धुर्वे (Bebika Dhurve) हिच्यासोबत गैर वर्तन केले होते. एल्विशने बेबिकावर अपमानस्पद टीप्पणी केली होती. यामुळे या आठवड्याच्या विकेंड का वार मध्ये त्याला (Bebika Dhurve VS Elvish) सलमान खानने खूप ऐकवले. त्याच्या या वागणुकीवर सलमानने एल्विशला खडसावले. आणि नीट समाजवले देखील. मात्र सलमान खानच्या या बोलण्यामुळे एल्विशचे (Salman Khan VS Elvish) चाहते नाराज झाले आहे. सोशल मीडियावर एल्विश ट्रेन्डिंगला असून त्याला अनेकांचे समर्थन मिळत आहे. सोशल मीडियावर सलमान खानवर उलटसुलट प्रतिक्रिया येत असून एल्विशची बाजू नेटकरी घेत आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर आता गॅगस्टर गोल्डीबार (Gagster Goldibar) याने देखील बिग बॉस ओटीटीचा होस्ट सलमान खानला धमकी (Goldibar Threat Salman) दिली आहे. त्याने एल्विशची बाजू घेत होस्ट सलमान खानला धमकी दिली आहे. एल्विश हा एक प्रसिद्ध युटुबर (You Tuber Elvish) आहे. शोमध्ये त्याने रंगत आणली आहे. सोशल मीडियावर देखील एल्विशची जोरदार फॅनफॉलोविंग आहे. त्याला सलमान खानने सुनावल्यानंतर नेटकरी त्याची बाजू घेताना दिसत आहेत. याचा विपरित परिणाम सलमान खानच्या (Salman Khan) सोशल मीडियावर झाला असून त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोवर्स कमी झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lenovo Launches ‘Lenovo LOQ’ Gaming Laptops Lineup in India: Price, Specs, and Availability Here

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याच्या व्हायरल फोटोंवर पहिल्यांदाच आदित्यने सोडले मौन; म्हणाला ही चांगली गोष्ट