Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याच्या व्हायरल फोटोंवर पहिल्यांदाच आदित्यने सोडले मौन; म्हणाला ही चांगली गोष्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये सध्या एका नवीन कपलची (Bollywood Couple) सर्वत्र चर्चा आहे. ते कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री अनन्या पांडे. (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) आदित्य व अनन्या हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले कपल आहे. या दोघांनी स्पेन मध्ये (Aditya And Ananya In Spain) जाऊन व्हेकेशन एन्जॉय केले. मात्र त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लवली कपलच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र आदित्य व अनन्या (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. आता पहिल्यांदाच अभिनेता आदित्यने त्यांच्या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

बी टाऊन मध्ये अनेक कपल हे लोकप्रिय आहेत. यामध्ये आता आदित्य व अनन्या यांची भर पडली आहे. त्यांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला. मात्र त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर एका इव्हेंटमध्ये त्याने व्हायरल फोटो व अनन्या सोबतच्या रिलेशनवर मौन सोडले. अभिनेता आदित्य रॉय कपूर म्हणाला की, “ही एक चांगली गोष्ट आहे की मी सोशल मीडिया जास्त वापरत नाही. पण मी याबद्दल नक्कीच ऐकले आहे. आदित्यला त्याच्या या पोर्तुगाल ट्रीपबद्दल देखील विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मला विश्रांतीची गरज होती. पण मी मुंबईचा पाऊस खूप मिस केला. मुंबईचा मान्सून (Mumbai Monsoon Update) मला खूप आवडतो. मी परत आलो तेव्हा आठवडाभर पाऊस सतत पडत होता.”

बॉलीवुडचे हे कपल मुंबईमध्ये परतल्यानंतर देखील एकमेंकासोबत फिरताना दिसत आहे. ते दोघे मुंबईमध्ये फिल्म डेटवर (Aditya And Ananya Movie Date) देखील गेले होते. आदित्य व अनन्या हे बार्बी हा चित्रपट बघण्यासाठी गेले होते. यावेळी अनन्याने पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. अनन्या व आदित्य (Aditya Roy Kapur And Ananya Pandey) हे कपल लाईमलाईट मध्ये आहे. या कपल मधील वयाच्या अंतरामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. आदित्य रॉय कपूर लवकरच ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) मध्ये भूमिका साकारणार असून यामध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अनन्या पांडे (Ananya Pandey) ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

PM Modi’s Pune Visit: Metro Rail Inauguration, Waste-to-Energy Plant, and PMAY Houses – Live Updates