Video : दिशा पाटनीच्या ओठांवर टेप लावून दिला सलमानने Kissing सीन; त्याचं सांगितलं कारण…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेता सलमान खान फिल्म ‘राधे : योर मोस्ट वान्टेड’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 13 मेला रिलीज होत आहे. या फिल्मचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. त्यामध्ये सलमान खान दिशा पाटनीला किस करत आहे. पण या किसिंग सीन दरम्यान दिशा पाटनीने तिच्या चेहऱ्यावर टेप लावली होती. त्यावर सलमान खानने मजेदार पद्धतीने याचे उत्तर दिले.

 

 

सलमान खानने सांगितले, की पुढच्या वेळी तुम्ही माझ्या आणि हिरोईनच्यामध्ये मोठा पडदा पाहा. पण मी ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी तोडणार नाही. मात्र, या पिक्सचमध्ये किस गरजेचा आहे. दिशासोबत नाहीये तर टेपवर किस आहे. सलमान खानने ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी सुरु केली आहे. सलमान खान या फिल्ममध्ये पोलिसाच्या भूमिकेत आहे. जो मुंबईला ड्रग्ज फ्री बनवू इच्छितो. ही फिल्म प्रभुदेवाने दिग्दर्शित केली आहे. यामध्ये सलमान आणि दिशासह रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफही विशेष भूमिका बजावत आहे. ही फिल्म Zee5 वर रिलीज केली जाणार आहे.

सलमान खान या फिल्ममध्ये 27 वर्षीय दिशासोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यावर म्हटले, की त्यांनी चांगले काम केले आहे. चांगले वाटत आहे. ती माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा वाटतो.