रणबीर कपूरसोबत कतरिनाला बिकिनीत पाहून संतापला होता भाईजान सलमान खान

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ब्रेकअप हा विषय बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवा नाही. तसंच एकमेकांना डेट करणं आणि त्यांच्या अफेयरच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होणं हे आपल्यासाठी नवीन नाही . आता हेच बघा ना… बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज भलेही आलिया भटला डेट करतो आहे पण एक वेळ असा होता जेव्हा तो आणि कतरिना कैफ यांच्या अफेयरच्या खूप चर्चा ऐकायला मिळत होत्या.

 

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या या फोटोंवर मीडियाने सलमान खानची प्रतिक्रिया जाणून घेताना तो खूप संतापला होता. तेव्हा दबंग खान म्हणाला होता, की त्याला कतरिना कैफचा हा फोटो मॉर्फ्ड आहे. तो म्हणाला होता की, “कुणी सुट्टीवर गेले आहे आणि अशारितीने त्यांचे फोटो क्लिक करणे चुकीचे आहे. हे तुमच्या आई आणि बहिणीसोबतही होऊ शकते. सलमानने मीडियाशी बोलताना सांगितले होते, की जर तुमच्या कुटुंबाचे फोटो अशा पद्धतीने सार्वजनिक झाले तर तुम्हाला कसे वाटेल?”

रणबीर आणि कतरिना हॉलिडेला इबिजा (स्पेन)ला गेली होती त्यावेळी कोणत्या तरी फोटोग्राफरने त्यांचे फोटो क्लिक केले होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोवर रणबीर आणि कतरिनानेही आक्षेप घेतला होता आणि म्हटले होते की त्यांच्या प्रायव्हेसीची काळजी घ्यावी. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. सध्या कतरिना कैफचे नाव विकी कौशलसोबत जोडले जात आहे.