सलमानचा बाॅडीगार्ड शेरा कुस्तीच्या आखाड्यात करणार दंगल

मिरजः पोलीसनामा आॅनलाईन
बाॅलीवुडचा भाईजान सलमान खान याचा बाॅडीगार्ड  शेरा आता मिरजेतील कुस्ती आखाड्यात उतरणार आहे. श्री आंबाबाई तालीम संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष संयज भोकरे यांनी माहिती दिली आहे.
संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आरोग्यरत्न पुरस्कार शेरा उर्फ गुरमीतसिंग याला प्रदान करण्यात येणार आहे. 25 जुलै (बुधवारी) रोजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा, मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भोकरे असतील.
[amazon_link asins=’B07DYFX2C8,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’409b2cd1-8e71-11e8-8343-015e57a974c6′]
अंबाबाई संस्थेने विविध खेळांना नेहमीच उत्तेजन दिले असून, संस्थेने अनेक नामवंत खेळाडू घडवले आहेत. सलमान खान आणि शेरा हे स्वतः व्यायामप्रेमी आहेत. दररोज दोन तास व्यायाम करतात. शेरा यांची टायगर ही सिक्युरीटी कंपनी असून त्याद्वारे चित्रपट, राजकारण, उद्योग अशा अनेक क्षेत्रात अनेक नामवंतांना सुरक्षा पुरवली जाते. अंबाबाई तालीम संस्थेतर्फे आरोग्यरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गाैरव केला जाईल, असे संजय भोकरे यांनी सांगितले आहे. यावेळी संस्थेच्या हॉलमध्ये काही पैलवानांसोबत ते मैत्रीपुर्ण कुस्तीही खेळतील. सांगली, मिरजेतील नवोदीत पैलवानांना डावपेच शिकवतील.

जाहिरात