Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभुचा ऑनस्क्रीन रोमांस पाहून नागा चैतन्य पडला मध्यांतरामध्येच थिएटर बाहेर

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिची लोकप्रियता अफाट आहे. तिचा चाहता वर्ग हा दाक्षिणात्य मनोरंजन विश्वापुरता मर्यादित नसून जगभर तिचे चाहते आहे. सामंथाने सध्या मनोरंजन विश्वापासून एक वर्षाचा ब्रेक घेतला असला तरी देखील ती सध्या लाईमलाईटमध्ये आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हिचा ‘खुशी’ हा चित्रपट (Kushi Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सामंथा रुथ प्रभुसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विजय व सामंथांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून यामध्ये दोघेजण ऑनस्क्रीन रोमांस करताना दिसणार आहेत. मात्र सामंथाचा (Samantha Ruth Prabhu) चित्रपटातील रोमांस तिचा पूर्वपती नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा पाहू न शकल्याने त्याने चित्रपटगृहातून काढता पाय घेतला आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु ही तिच्या चित्रपटांबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. सामंथाचा 2021 साली पूर्वपती नागा चैतन्यसोबत घटस्फोट (Samantha Ruth Prabhu Divorce) झाला आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना देखील खूप आवडत होती. सामंथा व नागा चैतन्य (Samantha And Naga Chaitanya) यांनी अनेक वर्षे एकमेंकांना डेट केल्यानंतर लग्न बंधनामध्ये अडकण्याचा निर्णय घेतला. सामंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये विवाह केला. मात्र अगदी काहीच वर्षामध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2021 साली या लवली कपलने घटस्फोट घेत चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्काच दिला. ते आता वेगळे झाले असले तरी अभिनेता नागा चैतन्यला तिने विजय सोबत रोमांस करताना पाहताना त्रास झाला आणि तो चित्रपटगृहाबाहेर निघून केला.

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य एक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला गेला होता. मात्र त्या चित्रपटाच्या इंटरव्हलमध्ये सामंथा रुथ प्रभु च्या आगामी ‘खुशी’ चित्रपटाचा ट्रेलर (Khushi Movie Trailer) दाखवण्यात आला. या चित्रपटामध्ये सामंथा व विजय यांचे अनेक रोमॅंटिंक सीन (Samantha And Vijay Romantic Scene) आहेत. मात्र ते पाहून नागा चैतन्यला तिथे बसवले नाही. आणि तो चित्रपट अर्धाच पाहून तडक थिएटर बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. ‘खुशी’ हा चित्रपट येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस (Khushi Movie Release Date) येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला व गाण्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ‘खुशी’ चित्रपटाचे प्रमोशन करत
असताना पूर्वपती नागा चैतन्यच्या गाण्यावर रडताना दिसून आली होती.
तिची देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या सामंथा ब्रेकवर असून आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात