Samantha Ruth Prabhu | समंथाच्या नव्या लूकने चाहत्यांना केले घायाळ; व्हेकेशन करत आहे एन्जॉय

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सिनेविश्व गाजवलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही नेहमी चर्चेत असते. समंथा सध्या सिनेविश्वापासून लांब असून तिने एक वर्षांचा मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान ती तिच्या शरीर व स्वास्थ यावर विशेष काळजी घेताना दिसत आहे. नुकतीच ती सद्गुरुंच्या आश्रमामध्ये देखील दिसून आली होती. आता ती समुद्रावर मुक्तपणे फिरताना दिसून आली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने आता छोटे केस केले असून हा तिचा न्यू लूक (Samantha New Look) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. समंथा ही तिच्या चाहत्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. ती तिच्या लाईफ अपडेट सोशल मीडियावर शेअर करते. सामंथाचे इंस्टाग्रामवर 28.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. समंथाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा समुद्र किनाऱ्यावरचा व्हिडिओ शेअर केला आहे. समंथाने यावेळी ग्रीन कलरचा क्रॉप टॉप परिधान केला असून तिची नवीन हेअर स्टाईल लक्षवेधी ठरत आहे. तिचे केस बारीक केले असून तिला हा हेअरकट अतिशय खुलून दिसत आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हेअरकट व तिची स्माईल आवडली आहे. अनेक चाहत्यांनी तिला रेड हार्ट कमेंट केले असून ‘अशीच हसत रहा’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने अनेक हिट दाक्षिणात्य चित्रपट (Samantha Hit Movies) दिले आहेत. आता तिने बॉलीवुडमध्येही तिची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री समंथाने (Samantha Ruth Prabhu) आता या पुढे एक वर्ष कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला असला तरी या वर्षी तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लवकरच समंथाचा अभिनेता वरुण धवनसोबत (Actor Varun Dhawan) ‘सिटाडेल’ हा चित्रपट (Citadel Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ती दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) याच्यासोबत ‘खुशी’ चित्रपटात (Khushi Movie) स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन्ही चित्रपटाचे तिने शुटिंग पूर्ण केले आहे. आता ती व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Savarkar Passed Away | मराठी मनोरंजन विश्वावर परसली शोककळा; जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन