Sangli ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) जीएसटी भवन (GST Bhawan) येथील व्यवसाय कर अधिकाऱ्याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. स्वप्नाली सतीश सावंत Swapnali Satish Sawant (वय 39) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीने (Sangli ACB Trap) ही कारवाई गुरुवारी केली.

याबाबत 42 वर्षाच्या महिलेने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार महिला काम करत असलेल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर व परफॉर्मन्स बोनस यावरील लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.

सांगली एसीबीच्या पथकाने बुधवार (दि.8) आणि गुरुवार (दि.9) पंचासमक्ष पडताळणी केली असता व्यवसाय कर अधिकारी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून तक्रारदार महिलेकडून लाच घेताना स्वप्नाली सावंत यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एसीबी पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील
(DySP Sandeep Patil), पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatraya Pujari),
पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (Police Inspector Vinayak Bhilare),
पोलीस अंमलदार धनंजय खाडे सीमा माने, अनिस वंटमुरे, जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Sangli ACB Trap | Female business tax officer caught in anti-corruption net while taking Rs 15 thousand bribe