‘संजय काकडे ग्रुप’चे धुमधडाक्यात आगमन ! कोथरुड व कर्वेनगर परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘ले स्कायलार्क’ गृह व व्यावसायिक प्रकल्पाचा शुभारंभ

पुणे : प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे यांनी बांधकाम व्यवसायात धूमधडाक्यात आगमन केले आहे. कोथरुड-कर्वेनगर भागात कर्वे रस्त्यावर डॉ. आंबेडकर चौकात संजय काकडे ग्रुप तर्फे ‘ले स्कायलार्क’ हा भव्य गृह व व्यावसायिक प्रकल्प साकारला जात आहे. त्याचा शुभारंभ प्रसिद्ध डॉक्टर व रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रँट आणि प्रथम ग्राहक विजय कुलकर्णी व संग्रामसिंह माळी यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी संजय काकडे ग्रुप चे प्रमुख संजय काकडे, संचालिका व ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या प्रमुख उषा काकडे, कोलते पाटील ग्रुप चे प्रमुख राजेश पाटील व मिलिंद कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

संजय काकडे ग्रुप च्या वतीने अनेक प्रकल्प राबवले गेलेत आणि पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर घालणारे हे सर्व प्रकल्प होते. संजय काकडे व त्यांचा ग्रुप गृहप्रकल्प करीत आहे. याचा आनंद असल्याचे डॉ.परवेझ ग्रँट यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संजय काकडे ग्रुप तर्फे गृह प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. गृह प्रकल्प साकारताना ग्राहकांची घराबद्दलची गरज लक्षात घेऊन आधुनिक जीवनशैलीला साजेसा असा हा प्रकल्प आहे. या भागातील नागरिकांना सेवा देण्यासाठी उपयुक्त अशा व्यवसायांना देखील या प्रकल्पामध्ये जागा आहे. विशेष म्हणजे कमर्शियल व रेसिडेन्शिअल प्रकल्प असून देखील दोन्हींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार देण्यात आले आहे. प्रकल्पाचे डिझाईन हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोथरुड व कर्वेनगर परिसराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प आहे, असे संजय काकडे ग्रुप चे प्रमुख संजय काकडे यांनी सांगितले.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायात आलेली मरगळ झटकून टाकणारा आणि प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ करणारा हा प्रकल्प ठरला आहे. वारजे रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातच हा प्रकल्प आहे. यामध्ये ए व बी बिल्डिंग असून त्यात 2 बीएचके (903 स्क्वेअर फूट) व 3 बीएचके (1213 स्क्वेअर फूट) आणि रिटेल व्यवसायासाठी या प्रकल्पामध्ये जागा आहे. हा प्रकल्प कोथरुड कर्वेनगर परिसरातील पहिलाच 40 मजली प्रकल्प आहे. यामधील खालचे दोन मजले रिटेल व्यवसायासाठी असून त्यावर पाच मजली पार्किंग आहे. त्यावर 32 मजली रेसिडेन्शिअल इमारत आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे कमर्शियल व रेसिडेन्शिअल साठी पूर्णपणे स्वतंत्र भव्य प्रवेशद्वार आहे. भव्य प्रवेश आणि लॉबी आहे. सुंदर डिझाईन केलेला पॅसेज, फाऊटन आणि कॉमन रिसेप्शन डेस्क आहे. बेसमेंट आणि पाच मजली पार्किंगची व्यवस्था आहे. हेवी ड्युटी केबल्ससह वीज पुरवठा असणार आहे. बीएमएस (बिल्डिंग मॅनेजमेंट सर्व्हिस) असणार आहे.

खेळासाठी स्वतंत्र झोन असून यामध्ये टेनिस कोर्ट, कॅरम, कार्ड रुमची सुविधा असणार आहे. मुलांना खेळण्यासाठी जागा व खेळणी असणार आहेत.

अत्याधुनिक जिम, योगा व मेडिटेशनसाठी जागा, इनडोअर गेम झोन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जागा, इनडोअर सिटिंग प्लाझा, पार्टी लॉन्स, अॅडमिन ऑफिस अशा विशेष सुविधा या प्रकल्पामध्ये आहेत.

उदंड प्रतिसादाबद्दल पुणेकरांचे आभार!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी आज शुभारंभाच्या दिवशी उदंड प्रतिसाद दिला. पुणेकरांनी दिलेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल संजय काकडे यांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.