Sanjay Raut | संजय राऊतांना पुन्हा ईडीची नोटीस, ‘या’ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांना नुकताच जामीन मिळाला आहे. ईडीने राऊत यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष पीएमएलए कोर्टातून (PMLA Court) संजय राऊतांना (Sanjay Raut) जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील (Goregaon Patrachal Scam) तपास ईडीने अद्यापही सुरु ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी (Inquiry) ईडीने राऊतांना पुन्हा नोटीस पाठवली आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) हे 100 दिवस तुरुंगात होते. 9 नोव्हेंबर रोजी कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) करण्यात आला होता. आता ईडीनं चौकशीसाठी संजय राऊत यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. 18 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून राऊतांना पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांचा जामीन रद्द करावा, अशी याचिका ईडीनं कोर्टात केली आहे.

 

संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याकरता ईडीकडून सुधारीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील याचिका घाईघाईनं तातडीच्या सुनावणीसाठी दाखल केल्यानं सुधारीत याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाने ईडीला परवानगी दिली होती. लवकरच संजय राऊत यांच्यावतीने देखील याला कोर्टात उत्तर दिले जाणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे (Justice Bharti Dangre) यांच्यासमोर 25 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) दिलेल्या जामीन विरोधात ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे.

ईडीच्या सुधारित याचिकेतील मुद्दे

-पत्राचाळ घोटाळा प्रकरण अत्यंत गंभीर आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करुन पुन्हा कारागृहात पाठवावं

– या प्रकरणात झालेल्या पैश्यांच्या गैरव्यवहारांची लिंक अर्थात मनी ट्रेल आम्ही कोर्टात सिद्ध करुनही,
कोर्टाने त्याचा विचार केला नसल्याचा ईडीने दावा केला आहे.

– मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं जामीनावर निकाल देताना सेक्शन 45 मधील तरतुदी विचारात घेतल्या नाहीत.

– राऊतांचा या गुन्ह्यात जाणीवपूर्वक आणि सक्रिय सहभाग आहे.

– कोर्टाने जामीन देताना ईडीवर ओढलेले ताशेरे, आदेशातून रद्द करुन सुधारीत आदेश द्यावा.

 

Web Title :- Sanjay Raut |ed notice to shivsena mp sanjay raut 18 november bombay hc marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा