Sanjay Raut On Disha Saliyan Case | दिशा सालियनचा दारूच्या नशेत 14 व्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने तिचा मृत्यू; प्रकरणाचा सीबीआय अहवाल समोर, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Disha Saliyan Case | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. पण दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाला नसून, तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी केला होता. या प्रकरणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव आले होते. त्यावर आता सीबीआयच्या तपासात एक वेगळी माहिती उघड झाली आहे. दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर (Narayan Rane) आगपाखड केली आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी एका तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. (Sanjay Raut On Disha Saliyan Case)

भाजप नेते आणि महिला नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला पाहिजे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा (सीबीआय) अहवाल आता समोर आला आहे. त्यात आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) कुठेही सहभाग नाही. तर तेव्हा तोंडाची थुंकी का उडवत होता. एका तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपने केला, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी राणे पितापुत्र आणि भाजप नेत्यांना धारेवर धरले आहे. (Sanjay Raut On Disha Saliyan Case)

दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.
या प्रकरणात सचिन वाझेचा वापर झाला होता. वाझेने सर्व प्रकरण दाबले, असा दावा देखील नारायण राणे यांनी
केला होता. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने नवीन माहिती दिली आहे.
दिशा सालियनचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्याने झाला. दिशा दारुच्या नशेत असताना तिचा तोल गेला
आणि ती 14 व्या माळ्यावरुन खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे.
सीबीआयने या प्रकरणाचा अहवाल जारी केला आहे.

Web Title :- Sanjay Raut On Disha Saliyan Case | sanjay raut on narayan rane nitesh rane over disha salian case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, चाकणमधील शिवसेना भवन समोरील घटना

Rivaba Ravindra Jadeja | क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल