Rivaba Ravindra Jadeja | क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल

गांधीनगर: वृत्तसंस्था – Rivaba Ravindra Jadeja | क्रिकेटर रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत मुलासोबत प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काँग्रेस नेते सुभाष गुजराती यांनी ही तक्रार निवडणूक आयोगात दिली आहे. रिवाबा यांच्यावरील आरोपांवरुन रविंद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनी देखील रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. (Rivaba Ravindra Jadeja)

रिवाबा निवडणूक प्रचारात आपल्या लहान मुलाचा वापर करत आहेत. त्यामुळे हे स्पष्टपणे बालमजुरीचे प्रकरण आहे, असे नयनाबा यांनी म्हंटले आहे. रिवाबा गुजरातच्या उत्तर भागातील जामनगर मधून उमेदवार आहेत. आणि त्या स्वत: राजकोट पश्चिमच्या मतदार आहेत. त्यामुळे त्यांनी तेथून निवडणूक लढवावी. जामनगरमध्ये रिवाबा कोणत्या अधिकारातून मते मागत आहेत. येथील प्रश्न देखील त्यांना माहीत नाहीत, असे नयनाबा म्हणाल्या आहेत. लग्नानंतर देखील रिवाबाने तिचे नाव बदलले नाही. रिवाबा तिचे नाव रिवा सिंग हरदेव सिंग सोलंकी लिहितात. तसेच रिवाबा रविंद्र जडेजा नाव कंसात लिहितात. त्या फक्त रविंद्र जडेजा यांच्या नावाचा वापर करत आहेत, असा दावा देखील नयनाबा यांनी केला आहे. (Rivaba Ravindra Jadeja)

रिवबा यांना भाजपने जामनगरमधून उमेदवारी दिली आहे. त्यांनी सोमवारी जामनगर मधून उमेदवारी अर्ज भरला.
निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी क्रिकेटर रविंद्र जडेजा देखील उपस्थित होता.
रिवबा यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची पूर्ण शक्यता होती.
त्या मागील काळात भाजपच्या अनेक कार्यक्रमांत दिसल्या होत्या. त्यामुळे भाजपने आता त्यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title :- Rivaba Ravindra Jadeja | congress has filed a complaint against ravindra jadejas wife rivaba in the election commission gujarat assembly elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | ‘या’ कारणामुळं मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; अनेक वर्षांनी कारण आलं समोर

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government | शिंदे सरकारला लवकर घालवले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पडतील