धर्म लपवून मंदिरात केलं लग्न, बिंग फुटल्यावर पत्नीलाच केली मारहाण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    धर्म लपवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन् तिच्याशी आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र लग्नानंतर सत्य बाहेर आल्यानंतर पिडीत मुलीने आरोपी युवकाला विरोध करत तिच्या कुटुंबाकडे जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आरोपीने तीला मारहाण करून तीच्यावर अत्याचार केला. दिल्लीतील रोहिणी परिसरातील प्रेमनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

पिडित मुलीने शेजाऱ्यांची मदत घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विवाहित मुलीची सुटका केली. डीसीपी रोहिणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 419, 467, 468, 471, 474, 376, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये मुख्य आरोपीचे वडील आणि दोन भाऊ यांचा समावेश आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. असा दावा केला जात आहे की, आरोपी अख्तरने आपला धर्म लपवून आणि बनावट नाव सांगून या युवतीशी मैत्री केली. त्यानंतर प्रेम प्रकरणानंतर आर्य समाज मंदिरात त्या मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर आरोपीची ओळख उघड झाली. तिच्यावरही अत्याचार करून विनयभंग करण्यात आला.