Sara Ali Khan | महाराशिवरात्री निमित्त सारा अली खानने मंदिरातील फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल; “तू फक्त नावालाच मुस्लिम आहेस….”
पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती विविध पोस्ट चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय बनत असतात. सोशल मीडियावर साराचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. आता पुन्हा एकदा साराने (Sara Ali Khan) Instagram वर काही फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
देशभरात नुकताच महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाकात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सारा खानने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विविध ठिकाणच्या शिवमंदिरातील फोटो शेअर करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण तिच्या या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सारा अली खानने फोटो शेअर करत “जय भोलेनाथ” असे कॅप्शन दिले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की सारा शिवमंदिरात पूजा करत आहे, यावेळी तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. तर कपाळाला चंदनाचा टिळा देखील लावला आहे. यावेळी सारा शिवभक्तीत लिन असल्याचे दिसत आहे. मात्र साराने मंदिरात जाऊन पूजा करणे काही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले नसल्याचे दिसत आहे. यावरून त्यांनी तिला ट्रोल केले आहे.
साराने फोटो शेअर करताच अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट केले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की,
“मुस्लिम असूनही तू मंदिरात जातेस तुला लाज वाटत नाही का?” तर दुसरा एका युजरने लिहिले
“मूर्ती पूजा इस्लाम मध्ये हरम मानली जाते”.
तर आणखीन एका युजरने “तू फक्त नावालाच मुस्लिम आहेस तुला अनफॉलो करत आहे”
असे एक ना अनेक कमेंट सध्या साराच्या (Sara Ali Khan) या फोटोवर पाहायला मिळत आहेत.
तर काहींनी दोन्ही धर्मांना सारा समानतेचे मानत असल्याने तिचे कौतुकही केले आहे.
सारा खानच्या या पोस्टवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर तिचा हि पोस्ट चर्चेचा विषय बनत आहे.
Web Title :- Sara Ali Khan | sara ali khan got trolled for share photo of worship of lord shiva on occasion of mahashivratri
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Taraka Ratna Passes Away | तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन
Bhandara Crime News | धक्कादायक! कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने महाप्रसादाच्या मंडपात शिरली कार