इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षा अधिकारी, सहायक निबंधक भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) येथे सुरक्षा अधिकारी आणि सहायक निबंधकांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार 21 सहायक निबंधक आणि एक सुरक्षा अधिकारी अशा एकूण 22 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर आहे. उमेदवार विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर, Ignou.Ac.In वर अर्ज करू शकतात.

पात्रता
सहायक निबंधक : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण पाहिजे. तसेच, 15 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवारांचे वय 42 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सुरक्षा अधिकारी : शैक्षणिक पात्रता ही पदव्युत्तर पदवी 55 टक्के असावी. उमेदवारांना 5 वर्षांचा अनुभवही असावा.

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने सहायक निबंधक आणि सुरक्षा अधिकारी यांच्या भरतीसाठी १ नोव्हेंबर २०२० रोजी एक छोटी नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानुसार 2 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. तथापि, विद्यापीठाने 22 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आणखी एका सूचनेनुसार अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे ढकलली. यानंतर इग्नूने आता जाहीर केले आहे की, 2 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या नव्या नोटीसच्या माध्यमातून इग्नू भरती ऑनलाइन अर्ज 1 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.